ठळक मुद्दे राज्याच्या ग्रामविकास मंत्रालयाने या बाबत सूचना दिल्या मुला-मुलींनी पालकांना शौचालय बांधून वापराचा आग्रह धरल्यास हा प्रकल्प पूर्णत्वास ध्वजारोहणा नंतर विद्याथ्र्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून स्वच्छतेची शपथ

ऑनलाईन लोकमत / मतीन शेख

मुक्ताईनगर, जि. जळगाव, दि. 13 - स्वच्छ  भारत अभियान अंतर्गत स्वच्छतेचा संदेश प्रत्येक घराघरापयर्ंत पोहचविण्यासाठी येत्या 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी राज्यातील प्रत्येक शाळेत विद्याथ्र्याना स्वच्छतेची शपथ दिली जाणार आहे.  राज्याच्या ग्रामविकास मंत्रालयाने या बाबत सूचना दिल्या असून याची काटेकोरपणे अंमलबजावणी बाबत प्रत्येक शाळेचा अहवाल मागविण्यात आला आहे.
प्रशासकीय स्तरावर स्वच्छ भारत अभियान  अंतर्गत प्रत्येक गाव हागणदारीमुक्त करण्यास   शौचालय उद्दिष्ट पूर्तीसाठी अधिकारी वर्गाची दमछाक होत आहे. अशात  कुटुंबातील मुला-मुलींनी पालकांना शौचालय बांधून वापराचा आग्रह धरल्यास हा प्रकल्प पूर्णत्वास जाईल यासाठी थेट शालेय विद्यार्थी   स्वच्छतादूत म्हणून काम करू शकतील  आणि स्वच्छता मिशनचा  प्रचार आणि प्रसिद्धी ग्रामीण भागात घराघरापयर्ंत पोहचेल. यासाठी येत्या 15 अॅागस्ट स्वातंत्र्यदिनाला राज्यातील प्रत्येक शाळेत ध्वजारोहणा नंतर विद्याथ्र्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून स्वच्छतेची शपथ दिली जाणार आहे 
याबाबत तालुका स्तरावरून गटशिक्षणाधिकारी कार्यालयातर्फे सर्व शाळेच्या मुख्यध्यापकांना स्वच्छतेची शपथबाबत तात्काळ सूचना देण्यात आल्या आहेत व 16 आगस्ट ला अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.