आता आचारसंहितेचा ‘बहाना’..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2017 12:24 AM2017-01-17T00:24:03+5:302017-01-17T00:24:03+5:30

समांतर रस्त्याचा विषय पुन्हा बासनात : आंदोलन करणा:या शहरातील सामाजिक संस्थाही झाल्या शांत

Now 'excuse' of the code of conduct .. | आता आचारसंहितेचा ‘बहाना’..

आता आचारसंहितेचा ‘बहाना’..

Next

जळगाव : शहरातून जाणा:या राष्ट्रीय महागार्मावर अपघात झाल्यानंतर प्रशासनाकडून बैठक घेण्यात येते, त्यात कारवाईचा इशारा दिला जातो. प्रत्यक्षात त्यांची अंमलबजावणी होत नाही. प्रशासनाच्या या चालढकलमुळे महामार्गावर एकापाठोपाठ बळी जात आहे. याचे ना प्रशासनाला सोयरेसुतक आहे ना लोकप्रतिनिधींना. आता तर निवडणुकांमुळे आचारसंहिता लागू झाल्याने आचारसंहितेचा बहाना केला जात आहे. प्रशासन व लोकप्रतिनिधींनी मनावर घेतले असते तर आतार्पयत महामार्गाची दैना कधीच दूर झाली असती. सर्वसामान्यांसाठी आवाज उठविणा:या सामाजिक संघटनांनीही आता शांत झाल्या आहेत. त्यामुळे प्रशासनाला फावत आहे. तीन आठवडय़ांपूर्वी समांतर रस्त्यांसाठी सपाटीकरणाचे काम हाती घेण्यात आले होते, ते सुद्धा आता थांबले आहे. साईडपट्टय़ांची दुरुस्ती फक्त डॉ.अग्रवाल चौकात करण्यात आली, त्यानंतर ती थांबली. प्रशासनाचे व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष त्यास कारणीभूत आहे.
सर्वपक्षीय   शांत
गेल्या डिसेंबर महिन्यात समांतर रस्त्याच्या विषयावरून सर्वपक्षीय पदाधिकारी एकत्र आले होते. जिल्हाधिका:यांकडे जाऊन तेथेही या पदाधिका:यांनी गा:हाणी मांडली, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना भेटूनही रस्त्याची निकड लक्षात आणून देण्यात आली.
तर प्रशासनाविरोधात गुन्हे
काही संतप्त पदाधिका:यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले होते की, यापुढे महामार्गावर निष्पाप बळी गेल्यास संबंधीत विभागांवर गुन्हे दाखल केले जातील. हे आंदोलन आटोपल्यानंतर महामार्गावर चार ते पाच अपघात झाले मात्र कोणत्याही विभागावर गुन्हा दाखल झाला नाही वा इशारे देणा:या संस्थांचे पदाधिकारी शांत बसून असल्याचेच दिसून येत आहे.
जिल्हाधिका:यांकडील बैठक निष्पळ
महामार्गावरील अपघात, समांतर रस्त्यांची निकड या बाबी लक्षात घेऊन जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल यांच्याकडे बैठक झाली होती. मनपा, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (नही) चे अधिकारी यांना या बैठकीस पाचारण करण्यात आले होते. समांतर रस्त्यांबाबत मनपाने प्रस्ताव द्यावा, ना हरकत द्यावे अशी नहीच्या अधिका:यांनी भूमिका मांडली होती.
तसेच महामार्गावरील अतिक्रमणे काढण्यासाठी मोहीम राबविण्याचेही जाहीर केले होते मात्र ही बैठक होऊन आता महिना उलटला तरीही पुढील हालचाली झालेल्या नाहीत. त्यामुळे झालेल्या बैठका, आंदोलने हे केवळ देखावा असल्याचेच आता लक्षात येत आहे.
4डिसेंबर महिन्यातील अपघातानंतर जिल्हाधिका:यांनी दिले होते आदेश
4रस्त्याच्या सिमांकनाचे संयुक्त काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महापालिका आणि भूमि अभिलेखा यांनी संयुक्तीपणे करावे
4महामार्गावरील अतिक्रमणांबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने द्यावा अहवाल
413.9 मिटरच्या शहरातून जाणा:या रस्त्याचा डीपीआर (प्रकल्प अहवाल) नही ने द्यावा
4अतिक्रमणांबाबतच्या तक्रारी लक्षात घेऊन ती 10 दिवसात काढली जावीत
4रस्त्यांवरील खड्डे बुजविणे व साईड पट्टय़ांच्या कामांसाठी प्राप्त निधीतून झालेल्या कामांचा अहवाल सादर करावा
4यासह समांतर रस्त्याची निकड लक्षात घेऊन त्याविषयी कार्यवाहीच्याही सूचना होत्या.
जळगाव : महामार्गालगच असलेल्या समांतर रस्त्यावरील अतिक्रमणांचा विषय गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. याबाबत अधिका:यांना सूचना दिल्या जाऊनही दुर्लक्षच होत आहे.
महामार्गावरून रोज जवळपास 20 ते 25  हजार वाहनांची ये-जा सुरू असते. त्यातच शहरातील नागरिकांना पर्यायी रस्ता नसल्यामुळे तेदेखील महामार्गावरूनच ये-जा करत असतात.  यावर पर्याय म्हणून जुना नशिराबाद नाका ते बांभोरी पुलार्पयत समांतर रस्त्याचे नियोजन आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजुने 60 मिटरची जागा पूर्वीच नॅशनल हायवे अॅथॉरिटीने संपादीत केली आहे. जवळपास 10 किलो मिटरचा हा समांतर रस्ता प्रस्तावित आहे. त्याबाबत न्यायालयातही कामकाज झाले, आदेश दिले गेले मात्र अद्याप अंमलबजावणी नाहीच.
 प्रभात चौक ते शिवकॉलनी
महामार्गावर प्रभात चौक ते शिव कॉलनी या रस्त्यावर सर्वाधिक अतिक्रमणे आहेत. फुलांच्या कुंडय़ा तयार करणारे, थंडीचे कपडे विक्री करणारे, खाद्य पदार्थ विक्रेते, लहान, मोठय़ा टप:या या भागात टाकण्यात आल्या आहेत. बहिणाबाई उद्यानाच्या मागील बाजूस तर डबर, विटा, खडी, वाळू विक्री करणा:यांनी दुकानदारी सुरू केली आहे. आपले खाजगी शो रूम असल्या प्रमाणे या मंडळी येथे टप:या टाकून बसले आहेत. आकाशवाणी चौकातही समांतर रस्त्यांच्या जागेवर हॉटेल्स, टप:यांचे जाळे पसरलेले दिसते. पुढे इच्छादेवी चौक, सदोबार वेअर हाऊसच्या समोर काही   दरवाजे खिडक्या विक्रेत्यांनी जागा व्यापली आहे.
अजिंठा चौफुलीवर वाहनांचे पार्किग, वाहने विक्रीची दुकाने, गॅरेज लावण्यात आले आहेत. तर कालिंका माता मंदिराच्या मागील बाजूस रस्त्यावर वॉलकंपांऊंड करून आत विक्रीची वाहने लावण्यात आली आहेत. गेल्या अनेक वर्षापासून रस्त्यांवरील ही अतिक्रमणे आहे तशीच आहेत. त्यात कमी नाही पण वाढच होत आहे. मात्र गेल्या अनेक वर्षात या अतिक्रमणांना कोणीही हात न लावल्याने समांतर रस्ता गायब झाला तर महामार्गही ब:याच ठिकाणी अरूंद झाला असल्याचेच लक्षात येत असून यामुळेच अपघातांचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत आहे.
जळगाव : समांतर रस्त्याच्या कामाला ना मनपा हात लावत ना ‘नही’ मात्र महापालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन जैन उद्योग समुहाने पुढाकार घेत  जवळपास दोन आठवडे समांतर रस्त्यांवरील सपाटीकरणाचे काम केले, मात्र आता हे कामही बंद झाले आहे.
महापालिकेने गेल्या महिन्यात स्वच्छता अभियान राबविले होते. त्या काळात केलेल्या आवाहनानंतर जैन उद्योग समुहाने दोन जेसीबी व चार डंपर मनपास देऊन समांतर रस्त्याच्या सपाटीकरणाच्या कामाला सुरूवात केली.
अधिकारी पदाधिका:यांनी घेतली भेट
मनपाचे महापौर नितीन लढ्ढा, आयुक्त जीवन सोनवणे यांनी जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक    जैन यांची भेट घेऊन समांतर रस्त्याच्या सपाटीकरणाच्या कामास मदत करावी  म्हणून आवाहन केले होते. त्यास जैन उद्योग समुहाने प्रतिसाद देऊन समांतर रस्त्याच्या सपाटीकरणाचे काम पुन्हा सुरूही केले. मात्र आता हे काम का थांबले कुणास          ठाऊक?
जळगाव : शहरातून जाणा:या राष्ट्रीय महामार्गावर गेल्या दीड महिन्यात अर्थात 45 दिवसात 9 अपघात झाले, त्यात 10 जणांचा बळी गेला आहे  तर दोन जण जखमी झाले आहेत. यातील काही बळी हे महामार्गावरील खड्डे, साईडपट्टय़ांची दैना, समांतर रस्त्याचा अभाव तर काही अवजड वाहनांच्या धडकेने झाले आहेत. वाढत्या अपघाताच्या पाश्र्वभूमीवर जिल्हाधिका:यांनी 13 डिसेंबर रोजी ‘नही’ च्या अधिका:यांची तसेच सर्वपक्षीय पदाधिका:यांची बैठक घेवून अपघातास कारणीभूत ठरणा:या अधिका:यांविरुध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. दोन दिवसात साईड पट्टयांची दुरुस्ती व खड्डे बुजविण्याचे आदेश दिले होते. मात्र ना खड्डे बुजविले गेले ना साईडपट्टय़ांची दुरुस्ती झाली. सदोष मनुष्यवधाचाही गुन्हा कोणावर दाखल झाला नाही.महामार्गावरील अग्रवाल हॉस्पिटल, शिव कॉलनी, गुजराल पेट्रोल पंप, विद्युत कॉलनी, खोटे नगर, अजिंठा चौक हे ठिकाण अत्यंत धोकादायक आहेत. शिव कॉलनी व बांभोरी पुलाजवळी कठडेही धोकादायक आहेत. तसेच महामार्गाला लागून अनेक ठिकाणी साईडपट्टय़ा अतिशय उंच आहेत. गतिरोधकही नियमात नाहीत. गेल्या आठवडय़ात शिव कॉलनी पुलाजवळून मालवाहू रिक्षा पलटी झाली होती.

Web Title: Now 'excuse' of the code of conduct ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.