बेंचेस प्रकरणी जळगावच्या जि.प. सीईओंना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 11:41 AM2018-05-22T11:41:49+5:302018-05-22T11:41:49+5:30

न्यायालयात जाणार

Notice to the Jalgaon Zp CEO | बेंचेस प्रकरणी जळगावच्या जि.प. सीईओंना नोटीस

बेंचेस प्रकरणी जळगावच्या जि.प. सीईओंना नोटीस

googlenewsNext
ठळक मुद्देटेंडर रद्द कराभजनी मंडळ साहित्याबाबतही नोटीस

आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. २२ - जिल्हा परिषदेने पॉलीमर बेंचेससाठी काढलेली ई निविदा ही बेकायदेशीर असून ती रद्द करावी तसेच बेंचेस खरेदीसाठी नियमानुसार शालेय शिक्षण समितीच्या खात्यावर रक्कम जमा करावी, अन्यथा उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशारा शिवसेनेचे गटप्रमुख रावसाहेब पाटील यांनी दिला आहे. याबाबतची नोटीस जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांंना सोमवारी सायंकाळी देण्यात आली.
यावेळी शिवसेनेचे उपगटप्रमुख पवन सोनवणे, सदस्य नानाभाऊ महाजन आदींची उपस्थिती होती. या नोटीसीत म्हटले आहे की, शासनाच्या डीबीटी नियमानुसार वस्तू न देता थेट लाभधारकांना रक्कम वितरीत होणे गरजेचे असताना निविदा काढणेच चुकीचे आहे. ५० लाखाच्यावर टेंडरला सर्वसाधारण सभेची मान्यता आवश्यक असताना या विषयास सर्वसाधारण सभेची मान्यता न घेता ९७ लाखाची थेट निविदा काढण्यात आली. याचबरोबर विषय समितीपुढेही हा विषय नियमानुसार आलाच नाही. एकूणच ही निविदा प्रक्रियाच बेकायदेशीर आहे. कायदेशीरच कार्यवाही व्हावी अन्यथा उच्च न्यायालयात दाद मागावी लागेल, असा इशारही नोटीस मध्ये देण्यात आला आहे. ही नोटीस अ‍ॅड. एस. एन. उदासी यांच्यामार्फत देण्यात आली आहे.
भजनी मंडळ साहित्याबाबतही नोटीस
जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून भजनी मंडळाचे ४९ लाखाचे साहित्य वितरीत करण्यासाठी काढलेल्या निविदेतही अटी व शर्र्तींचे उल्लघन झाले असून या विरुद्ध ओरड झाल्यावर हे टेंडर रद्द झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले मात्र पुन्हा टेंडर काढण्याच्या हालचालींची चाहूल लागल्याने याबाबतही न्यायालयात जाण्याची नोटीस रावसाहेब पाटील यांनी दिली आहे.

Web Title: Notice to the Jalgaon Zp CEO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.