कोणत्याही क्षणी होवू शकते महापालिकेचे बॅँक खाते सील !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 11:21 AM2019-01-23T11:21:21+5:302019-01-23T11:21:26+5:30

‘डीआरएटी’ ने डिक्री रद्दचे अपील फेटाळले

NMC may seal the bank account at any time! | कोणत्याही क्षणी होवू शकते महापालिकेचे बॅँक खाते सील !

कोणत्याही क्षणी होवू शकते महापालिकेचे बॅँक खाते सील !

Next
ठळक मुद्दे प्रशासन अंधारात


जळगाव : हुडकोकडून कर्जापोटी डिआरटी कोर्टाने मनपास ३४१ कोटी रुपये कर्ज भरण्यासंदर्भात हूकमनामा (डिक्री) दिला होता. यानिकाला विरोधात मनपाने दाखल केलेले अपील कोर्टाने फेटाळून लावले आहे, त्यामुळे कोणत्याही क्षणी हुडकोकडून मनपाचे बॅँक खाते सील होण्याची शक्यता आहे.
मंगळवारी मनपात झालेल्या स्थायी समितीच्या सभेत शिवसेनेचे नगरसेवक नितीन लढ्ढा यांनी ही धक्कादायक माहिती देताना हुडकोकडून केव्हाही बॅँक सील करण्याची किंवा मनपाच्या मिळकती ताब्यात घेण्याची कारवाई देखील होण्याची भीती व्यक्त केली. दरम्यान, या प्रकरणी स्थायी समिती सभापती जितेंद्र मराठे यांनी मनपा उच्च न्यायालयात याबाबत याचिका दाखल करणार असल्याची माहिती दिली.
मनपा प्रशासन व सत्ताधाऱ्यांना माहितीही नाही
नितीन लढ्ढा यांनी ही डीक्री रद्दचे अपील फेटाळल्याची माहिती स्थायी समितीच्या सभेत दिली. मात्र, या सुनावणीदरम्यान ही याचिका फेटाळण्यात आली. याबाबत सत्ताधारी किंवा मनपा प्रशासनाला देखील कोणतीही माहिती दिसून आली नाही. तसेच लढ्ढांकडून ही माहिती सभेत दिली जात असताना काही भाजपा सदस्यांनी या विषयावर गांभिर्याने न घेता जुन्या सत्ताधाºयांना दोष देण्यातच धन्यता मानली. या विषयावर सभेत चर्चा होणे गरजेचे होते. तसेच डिक्री रद्दची अपील फेटाळण्यात आल्यामुळे आता संभाव्य जप्ती रोखण्यासाठी मनपाकडून होणाºया उपायोजनांबाबत देखील कोणतीही चर्चा सभेत झाली नाही.
काय आहे प्रकरण
1 सन २००१ मध्ये हुडकोने हे कर्ज एनपीए घोषीत केले होते. त्यानतंर सन २००४ मध्ये कर्जाचे रिसेटलमेंट करण्यात आले. मात्र त्यानुसार देखील महापालिकेने फेड केली नाही. कर्जफेड होत नसल्याने हुडकोने याप्रकरणी डिआरटी कोर्टात सन २०११ मध्ये याचिकाही दाखल केली आहे. त्यावेळी हुडकोने पुन्हा ३४० कोटी रुपयांची मागणी केली होती.
2 सन २०१२ मध्ये ठरल्यानुसार कर्जफेडीचा पहिला १२९ कोटीचा हप्ता मनपाने भरला नाही. त्यामुळे तारण असलेली सतरामजली इमारत व गोलाणी संकुलाच्या लिलावाची नोटीस डीआरटी कोर्टाने काढली होती. त्यानतंर ७ आॅगस्ट २०१४ रोजी महापालिकेची खाती डिआरटीच्या आदेशाने सील केली होती.
3 दीड महिन्यानंतर मनपाने दाखल केलेल्या याचिकेनुसार ही खाती मोकळी करण्यात आली. त्यानतंर उच्चन्यायालयाच्या आदेशाने एकरकमी प्रकीया सुरु करण्यात आली. हुडकोच्या थकीत कर्जफेडीच्या हप्तायासाठी मुंबईच्या डिआरटी कोर्टाने जळगाव मनपाला ३४० कोटी ७४ लाख ९८ हजार ६२७ रुपये २९ पैसे पंधरा दिवसात भरण्याचे आदेश डिक्री नोटीसव्दारे दिले हेते. विशेष म्हणजे या रक्कमेवर हुडकोने दावा दाखल केलेल्या तारखेपासून १२ टक्के व्याज प्रतिवर्ष देण्याचे देखील या आदेशात म्हटले होते.
4 महापालिकेने आदेशाला स्थगिती मिळविण्यासाठी डिआरएटीकडे अपील दाखल केले होते. मात्र, सोमवारी सुनावणीत डिआरएटी ने मनपाचे अपील फेटाळल्याने हुडकोला आता ३४१ कोटी वसुलीसाठी मनपाचे बॅँक सील करणे किंवा मिळकतींवर ताबा मिळवण्याची मुभा मिळवली आहे.
डिआरएटी कोर्टाने मनपाचे अपील फेटाळले असले तरी उद्या मनपाच्या वकीलांकडून उच्च न्यायालयात याचिका दाखल केली जाणार आहे. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून हुडकोकडून एकरकमी कर्जफेड करण्याचा प्रयत्न आमच्याकडून राहणार आहे. -सुरेश भोळे, आमदार
डिआरएटी कोर्टाच्या निर्णयानंतर उच्च न्यायालयात पुर्नसंचयन अर्ज दाखल केला जाणार आहे. तसेच एकरकमी कर्जफेडीचा पर्याय देखील मनपाकडे उपलब्ध आहे. याबाबत मनपाच्या वकिलांना तशा सूचना देण्यात आल्या आहेत. -चंद्रकांत डांगे, आयुक्त, मनपा

Web Title: NMC may seal the bank account at any time!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.