निमगव्हाणच्या तरुणांनी केली तापी नदी पात्राची स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 05:09 PM2017-11-16T17:09:29+5:302017-11-16T17:13:13+5:30

युवाशक्ती ग्रुप व रासेयो स्वयंसेवकांनी केले १ ट्रॉली कचºयाचे संकलन

Nimgavhan's youth cleaned the Tapi river bed | निमगव्हाणच्या तरुणांनी केली तापी नदी पात्राची स्वच्छता

निमगव्हाणच्या तरुणांनी केली तापी नदी पात्राची स्वच्छता

Next
ठळक मुद्देचार तास राबविले स्वच्छता अभियानचार तास राबविले स्वच्छता अभियानयुवाशक्ती गृप व रासेयोच्या स्वयंसेवकांचा समावेश

आॅनलाईन लोकमत
चोपडा,दि.१६ - तालुक्यातील निमगव्हाण येथील युवाशक्ती ग्रुप व राष्ट्रीय सेवा योजना अर्थात एन.एस.एस. च्या स्वयंसेवकांनी गुरुवारी सकाळी निमगव्हाण येथील तापी पुलाच्या खाली व श्री.धुनिवाले दादाजी मंदिराच्या पायथ्याशी स्वच्छता अभियान राबविले.
तापी नदी पात्रात नेहमीच पुलावरून प्रवास करणारे प्रवासी तसेच गावातील नागरिक घरातील टाकाऊ वस्तू नदीपात्रात टाकतात. सदर टाकाऊ वस्तूंमध्ये निर्माल्य, केरकचरा, प्लास्टिक पिशव्या, सुकलेले फुलहार, जुने फोटो, लग्नपत्रिकांचा समावेश आहे.
नदीचे पाणी ओसरल्यानंतर टाकाऊ कचरा व घाण अस्ताव्यस्त स्वरूपात सगळीकडे विखुरलेले दिसत होते. युवाशक्ती ग्रुप व राष्ट्रीय सेवा योजना (एन.एस.एस) च्या स्वयंसेवकांनी तापी नदी पात्रात स्वछता अभियान राबविले. या मोहिमेत सुमारे १ ट्रॉली केरकचरा संकलित करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली.
तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष धनराज सिताराम बाविस्कर, ग्रामपंचायत सदस्य तथा रासेयोचे माजी वरिष्ठ स्वयंसेवक अनिल शिवाजी बाविस्कर यांच्या संकल्पनेतून सुमारे ४ तास श्रमदान करून हि स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
स्वच्छता अभियानात युवाशक्ती ग्रुपचे स्वयंसेवक उमेश बाविस्कर,नरेंद्र मैराळे, मधुकर खंबायत, स्वयंसेवक प्रकाश पाटील, जयेश बाविस्कर , प्रशांत बाविस्कर, योगेश कोळी यांनी सहभाग नोंदविला.

Web Title: Nimgavhan's youth cleaned the Tapi river bed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.