महाराणा प्रतापांवरील गाण्याला नीलेश राजपूत यांचा स्वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 08:06 PM2018-08-31T20:06:09+5:302018-08-31T20:07:21+5:30

चाळीसगावात तालुक्यातील दडपिंप्री येथील युवकाचा पुढाकार

Nilesh Rajput's voice to the song on Maharana Pratap | महाराणा प्रतापांवरील गाण्याला नीलेश राजपूत यांचा स्वर

महाराणा प्रतापांवरील गाण्याला नीलेश राजपूत यांचा स्वर

googlenewsNext

चाळीसगाव, जि.जळगाव : व्यवसाय प्रिटींग प्रेसचा. मात्र गाण्याचीही आवड. याच आवडीमुळे दडपिंप्री येथील नीलेश राजपूत या युवकास महाराणा प्रतापांवरील गीत गाण्याची संधी मिळाली.
प्रा. शिवाजी साळुंखे यांच्या गीतास गौरव काळंगे यांनी संगीत दिले आहे. सद्य:स्थितीत यू-ट्यूबवर या गाण्याला पसंती दिली जात आहे. लवकरच संगीत कंपनीमार्फत सीडीच्या स्वरुपात हे गाणे रसिकांच्या भेटीला येणार आहे. नीलेश राजपूत यांनी स्वत:चा सूर प्रवाह आॅर्केस्टादेखील तयार केला आहे. महाराणा प्रताप यांच्यावरील मराठी भाषेतील पहिल्याच गीताला स्वरसाज दिल्याचा आनंद मोठा असल्याची प्रतिक्रिया राजपूत यांनी दिली. शिवाजी महाराजांवरील गाणेही गाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: Nilesh Rajput's voice to the song on Maharana Pratap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.