नांद्रा येथे दारूबंदीसाठी नव्याने ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 01:02 PM2017-08-22T13:02:32+5:302017-08-22T13:03:37+5:30

20 दिवसांनी मतदान घेतले जाणार

New resolution for drunkenness in Nandra | नांद्रा येथे दारूबंदीसाठी नव्याने ठराव

नांद्रा येथे दारूबंदीसाठी नव्याने ठराव

Next
ठळक मुद्दे काही तरतुदींचे पालन झाले नसल्याचा नकारात्मक अहवाल ग्रामसभेत ठराव करून मतदानही झाले दारू दुकान बंद करण्याची गावातील महिलांनी केली होती मागणी

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 22 - तालुक्यातील नांद्रा बुद्रुक गावात दारू बंदीच्या मागणीसाठी करण्यात आलेल्या मतदान व ठरावाच्या प्रक्रियेत नियमाच्या काही तरतुदींचे पालन झाले नसल्याचा नकारात्मक अहवाल राज्य उत्पादन शुल्क अधीक्षकांनी दिल्याने या दारू दुकानांवरील कारवाई टळली आहे.
  दरम्यान ग्रामस्थांनी याबाबत सोमवारी उपजिल्हाधिकारी अभिजित भांडे यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यात आधीच्या प्रक्रियेत त्रुटी राहिल्याने दोन दिवसांत नव्याने 25 टक्के महिलांच्या सह्यांचे निवेदन जिल्हाधिका:यांना देण्यात येऊन मतदानाची मागणी केली जाणार असून 20 दिवसांनी मतदान घेतले जाणार आहे. 
दारू दुकान बंद करण्याची मागणी गावातील महिलांनी केली होती. तसा ग्रामसभेत ठराव करून मतदानही झाले होते. मात्र राज्य उत्पादन शुल्क अधीक्षकांनी या ठरावाच्या व मतदानाच्या प्रक्रियेबाबत नकारात्मक अहवाल दिल्याने सोमवारी पं.स. समिती सदस्य हर्षल चौधरी, चुडामण वाघ, विलास चौधरी, कमलाकर सोनवणे, हिरामण वाघ, शरद सोनवणे, नरेंद्र पाटील, ज्ञानेश्वर सोनवणे, आदींनी उपजिल्हाधिकारी अभिजित भांडे यांची भेट घेतली. 

Web Title: New resolution for drunkenness in Nandra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.