चोपडय़ाजवळ सागवान लाकडासह दोघांना पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2017 05:43 PM2017-07-17T17:43:18+5:302017-07-17T17:43:18+5:30

चोपडा वनविभागाची यावल रस्त्यावर कारवाई

Near the Chopda caught both the wood with wooden wood | चोपडय़ाजवळ सागवान लाकडासह दोघांना पकडले

चोपडय़ाजवळ सागवान लाकडासह दोघांना पकडले

Next
>ऑनलाईन लोकमत
चोपडा,दि.17 - चारचाकी वाहनातून सागवान लाकडाची वाहतूक करणा:या दोघांना चोपडा वनविभागच्या अधिका:यांनी सापळा रचून पकडले. त्यांच्याजवळून सागवानी लाकडाचे 17 नग व चारचाकी वाहन असा 75 हजार 860 रूपयांचा ऐवज जप्त केला.
 16 रोजी सायंकाळी अडावद येथून धुळ्याकडे  शे.इम्रान शेख हुसेन (27)  व एक अल्पवयीन आरोपी कारमधून (एम.एच. 15 -बीडी 3072)  सागवानी पाटा असलेले  व साडे तीन ते चार फूट लांबीचे 17 नग घेऊन जात असल्याची माहिती चोपडा वनक्षेत्रपाल पी.बी.पाटील यांना  मिळाली. त्यांनी आपल्या पथकाचा यावल रोडवरील  महाविद्यालयाजवळ   सायंकाळी सापळा लावला. आरोपींना वाहनासह पकडण्याचा प्रय} केला. मात्र वाहन सुरू अवस्थेत सोडून आरोपी चालक शेख इम्रान शेख हुसेन याने पळ काढला.  त्याचा पाठलाग करून पथकाने त्याला उपजिल्हा रुग्णालयाजवळ पकडले. दोघांना वनक्षेत्रपाल पी.बी. पाटील, आगाररक्षक बी.एन.पाटील, लासुर वनपाल प्रतिभा सोनवणे, वनरक्षक के.एल.धनगर यांनी  मुद्देमाल व वाहनासह ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे असलेला सागवानी लाकूड एकूण 0.448 घन मीटर एवढे  आहे.

Web Title: Near the Chopda caught both the wood with wooden wood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.