भुसावळात बंदिस्त नाट्यगृहाच्या मागणीसाठी नटराज पूजन करून घातले साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2018 10:50 PM2018-11-05T22:50:48+5:302018-11-05T22:51:54+5:30

अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या भुसावळ शहरातील बंदिस्त नाट्यगृहाच्या मागणीकडे प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी गांधी पुतळा चौकात रंगकर्र्मींनी सोमवारी रंगभूमी दिनानिमित्त एकत्र येत नटराज पूजन केले.

Natarajan worshiped for the demand of a playground in the middle of the house | भुसावळात बंदिस्त नाट्यगृहाच्या मागणीसाठी नटराज पूजन करून घातले साकडे

भुसावळात बंदिस्त नाट्यगृहाच्या मागणीसाठी नटराज पूजन करून घातले साकडे

Next
ठळक मुद्देमेळाव्याला शहरातील ज्येष्ठ व नवोदित रंगकर्मीची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.नगराध्यक्षांना रंगकर्र्मींनी दिले मागण्यांचे निवेदन

भुसावळ, जि.जळगाव : अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या भुसावळ शहरातील बंदिस्त नाट्यगृहाच्या मागणीकडे प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी गांधी पुतळा चौकात रंगकर्र्मींनी सोमवारी रंगभूमी दिनानिमित्त एकत्र येत नटराज पूजन केले.
या वेळी ज्येष्ठ रंगकर्मी सुनंदा औंधकर, रमाकांत भालेराव, वीरेंद्र पाटील, नारायण माळी, धनराज कुंवर, तुषार जोशी, मयूर सुरवाडे, अजय पाटील, रितेश वानखडे, खुशाल निंबाळे आदी उपस्थित होते.
तत्पूर्वी मराठी रंगभूमी दिनानिमित्त भुसावळातील स्नेहयात्री प्रतिष्ठानने सेंट मेरी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सकाळी १० वाजता ज्येष्ठ व नवोदित रंगकर्मींच्या स्नेहमेळाव्याचे आयोजन केले होते.
या मेळाव्यात नाट्यगृहाच्या मागणीचे निवेदन देण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. त्यानुसार नगराध्यक्ष रमण भोळे यांची भेट घेऊन हे निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनावर शहरातील ४० रंगकर्मींच्या स्वाक्षऱ्या आहेत. प्रसंगी जेष्ठ रंगकर्मी अरुण मांडाळकर, डॉ.दिलीप देशमुख, अनिल कोष्टी, पंकज जोशी, प्रकाश चौधरी, संजीवनी यावलकर, संजय यावलकर, आशा पाटील यांच्यासह अनेक नवोदित रंगकर्मी उपस्थित होते.


 

Web Title: Natarajan worshiped for the demand of a playground in the middle of the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.