फैजपूर येथे संगीतमय श्रीरामकथा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 08:10 PM2019-07-21T20:10:33+5:302019-07-21T20:11:40+5:30

फैजपूर येथील खंडोबा वाडी देवस्थानात गुरुपौर्णिमा व महंत श्री घनश्याम दासजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने नऊ दिवसीय संगीतमय श्रीराम कथेच्या आजच्या चौथ्या दिवसाच्या प्रयोजनामध्ये प्रभू श्रीरामांचा जन्म दिवस उत्साहाने साजरा केला गेला.

Musical Sriramakatha started at Fazpur | फैजपूर येथे संगीतमय श्रीरामकथा सुरू

फैजपूर येथे संगीतमय श्रीरामकथा सुरू

Next
ठळक मुद्देश्रीराम कथेत बालरूप श्रीरामांचा जन्मोत्सव झाला साजरानऊ दिवसीय कथेचा २५ जुलै रोजी होणार समारोप

फैजपूर, ता.यावल, जि.जळगाव : येथील खंडोबा वाडी देवस्थानात गुरुपौर्णिमा व महंत श्री घनश्याम दासजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने नऊ दिवसीय संगीतमय श्रीराम कथेच्या आजच्या चौथ्या दिवसाच्या प्रयोजनामध्ये प्रभू श्रीरामांचा जन्म दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला गेला.
कथाकार पंडित अजय भार्गव (मानसमणी) महाराजांनी रामायणातील काव्यपंक्ती गाऊन संदेश दिला की, ‘जेव्हा जेव्हा धर्माचा ºहास होईल तेव्हा हिंसा व असुरांचा प्रभाव वाढेल. आतंकवादचोरी, लुटमार, अपहरण आदी गोष्टी वाढल्यामुळे पृथ्वी व्याकुळ होईल. जसे की त्रेतायुगामध्ये लंकापती रावणाचे अत्याचार वाढत गेले. तेव्हा अयोध्येमध्ये महाराज दशरथ व राणी कौशल्या मातेकडे प्रभू श्रीरामांनी जन्म घेतला.’
श्रीरामाच्या जन्माच्या भूमिकेत सजीव देखाव्यात ललित दिनकर नारखेडे यांचा एक वर्षीय चिरंजीव कार्तिक होता.
‘चार चार प्रकटे ललनवा- अवध में’ हे अभिनंदनपर गीत गाऊन पंडित अजय शंकर भार्गव महाराज यांनी सुंदर आवाजात गाऊन उपस्थित हजारो श्रोत्यांना नाचण्यास भाग पाडले. अत्यानंदित होऊन सर्व स्रोत्यांनी एकमेकांना अभिनंदन करत प्रभू श्रीरामांचा जन्म मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरा केला.
खंडोबा देवस्थानाचे गादिपती महामंडलेश्वर श्री पुरुषोत्तम दासजी महाराज यांच्या कृपेमुळे श्रीराम कथेचे मुख्य यजमान धनराज नारखेडे आणि अरुण होले हे सपत्नीक व सह परिवारासोबत पूजन करून हजारो भक्त व श्रोतागण धन्य झाले. कथेची समाप्ती भंडारा व संत संमेलनाने २५ जुलैला होईल.
महाआरती माजी आमदार शिरीष चौधरी, मसाका चेअरमन शरद महाजन, फैजपूर शहरातील सर्व डॉक्टर, माजी नगराध्यक्ष पांडुरंग सराफ, सपोनि प्रकाश वानखेडे, फौजदार जिजाबराव पाटील यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आली.
रोज सायंकाळी सहा ते रात्री दहापर्र्यंत कथा ऐकण्यासाठी व संतांचे दर्शन घेण्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Web Title: Musical Sriramakatha started at Fazpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.