मुक्ताईनगरात अंकूर मराठी साहित्य संमेलन ६ व ७ जून रोजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 06:44 PM2019-05-22T18:44:36+5:302019-05-22T18:45:24+5:30

मुक्ताईनगर येथील शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनतर्फे आयोजित ५७वे अखिल भारतीय अंकूर मराठी साहित्य संमेलन येत्या ६ व ७ जून रोजी आदिशक्ती संत मुक्ताईच्या पावनभूमीत गोदावरी मंगल कार्यालयात आयोजित केले आहे.

Muktainagarat Ankur Marathi Sahitya Sammelan on 6th and 7th June | मुक्ताईनगरात अंकूर मराठी साहित्य संमेलन ६ व ७ जून रोजी

मुक्ताईनगरात अंकूर मराठी साहित्य संमेलन ६ व ७ जून रोजी

Next
ठळक मुद्देदोन दिवसीय साहित्य संमेलनात विविध कार्यक्रमबहारदार लावणीचा कार्यक्रमही रंगणारविविध पुरस्कारांचेहे वितरण

मुक्ताईनगर, जि.जळगाव : येथील शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनतर्फे आयोजित ५७वे अखिल भारतीय अंकूर मराठी साहित्य संमेलन येत्या ६ व ७ जून रोजी आदिशक्ती संत मुक्ताईच्या पावनभूमीत गोदावरी मंगल कार्यालयात आयोजित केले आहे. या संमेलनात विविध कार्यक्रम होणार आहेत.
साहित्यिक प्राचार्य डॉ.किसन पाटील अध्यक्षस्थानी असतील. माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे उद्घाटन करतील.
स्वागताध्यक्ष खासदार रक्षा खडसे असतील. विशेष अतिथी म्हणून हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार, केंद्रीय मानवाधिकार संघटना नवी दिल्लीचे राष्ट्रीय अध्यक्ष मिलिंद दहिवले, डॉ.विकास बाबा आमटे आनंदवन, भारताच्या पहिल्या महिला कुस्तीपटू सुवर्णकन्या अंजली वललाकटटी, संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र राज्याचे प्रवक्ता डॉ.शिवानंद भानुसे, जय मल्हार सेनेचे लहू शेवाळे, माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत भाऊ पाटील आदी उपस्थिती राहणार आहे.
संमेलनाच्या पहिल्या दिवशी ग्रंथदिंडी, उद्घाटन, सोहळा, परिसंवाद, सीमरन पवार, पुणे यांचा बहारदार लावणीचा कार्यक्रम, प्रा.ज्ञानेश वाकुडकर, नागपूर यांचा बहारदार काव्यगीतांचा कार्यक्रम, कळमनुरी, जि.नांदेड येथील हास्यसम्राट शिलवंत वाढवे यांचा हास्य रंगारंग कार्यक्रम, याच दिवशी अंकुर वाङ्मय पुरस्कारसुद्धा प्रदान करण्यात येणार आहे. रात्री कविसंमेलनाचे आयोजन तर दुसऱ्या दिवशी मराठी गझल मुशायरा, कथाकथन, परिसंवाद, सुप्रसिद्ध गीतकार प्रा.जगदीश वेदपाठक यांचा मराठी गीतांचा बहारदार कार्यक्रम, गीतकार माया धुप्पड यांच्या जात्यावरच्या ओव्या आणि सुप्रसिद्ध गीतकार प्रवीण दवणे यांच्या व्याख्यानाने समारोप, संध्याकाळी राहिलेल्या कवींचे कविसंमेलन त्याच दिवशी शिवचरण उजजैनकर फाऊंडेशनचे जाहीर झालेले साहित्य पुरस्कार वितरणसुद्धा होणार आहे, असे संमेलनाचे मुख्य आयोजक तथा शिवचरण उज्जैनकर फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष एस.एम.उज्जैनकर यांनी केले आहे.

Web Title: Muktainagarat Ankur Marathi Sahitya Sammelan on 6th and 7th June

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.