मूगडाळ क्विंटलमागे ६०० रुपयांनी वधारली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 03:56 AM2018-04-16T03:56:46+5:302018-04-16T03:56:46+5:30

ऐन काढणीच्या हंगामात झालेल्या गारपिटीमुळे मुगाच्या पिकाला फटका बसून उत्पादनावर परिणाम झाला आहे. बाजारपेठेत मूगडाळीची आवक घटल्याने भाव ५०० ते ६०० रुपये प्रति क्विंटलने वाढून ७,००० ते ७,३०० रुपये झाली आहे.

Mughdal Quintal rose by Rs 600 | मूगडाळ क्विंटलमागे ६०० रुपयांनी वधारली

मूगडाळ क्विंटलमागे ६०० रुपयांनी वधारली

googlenewsNext

- विजयकुमार सैतवाल
जळगाव  - ऐन काढणीच्या हंगामात झालेल्या गारपिटीमुळे मुगाच्या पिकाला फटका बसून उत्पादनावर परिणाम झाला आहे. बाजारपेठेत मूगडाळीची आवक घटल्याने भाव ५०० ते ६०० रुपये प्रति क्विंटलने वाढून ७,००० ते ७,३०० रुपये झाली आहे.
केवळ ६० दिवसांचे पीक असलेल्या मुगास यंदा सलग पाणी मिळाले नाही, त्यातच गारपिटीमुळे जवळपास ३० ते ३५ टक्के उत्पादन घटले. २५ ते ३० टक्क्यांनी मागणी वाढली असताना आवक कमी झाली आहे. जळगाव जिल्ह्यातील मालाबरोबरच मराठवाडा व विदर्भातून येणाऱ्या मुगाचीही आवक कमी झाली आहे. एरव्ही सर्वाधिक मागणी असलेल्या तूरडाळीला मूगडाळीने भावात मागे टाकले आहे. तूरडाळ ६,००० ते ६,४०० रुपये असताना, मूगडाळीचे भाव ७,००० ते ७,३०० वर पोहोचले आहे.

उत्पादनावर परिणाम झाल्याने बाजारपेठेत डाळींची आवक कमी आहे. मूगडाळीचे भाव ५०० ते ६०० रुपये प्रति क्विंटलने वाढले आहेत.
- प्रवीण पगारिया, अध्यक्ष,
ग्रेन किराणा मर्चंट असोसिएशन

Web Title: Mughdal Quintal rose by Rs 600

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.