पोलिसांचा वसुलीवरच अधिक भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 02:13 PM2018-06-05T14:13:07+5:302018-06-05T14:13:07+5:30

जळगाव शहरातील वाहतूक नियंत्रणासाठी जिल्हा व शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी रस्त्यावर उतरले असले तरी प्रत्यक्षात या कर्मचाऱ्यांकडून मुळ वाहतूक नियंत्रण सोडून वसुलीवरच अधिक भर दिला जात असल्याच्या तक्रारी शहरातील अनेक नागरिक व वाहनधारकांनी ‘लोकमत’ कडे केल्या आहेत.

More on the recovery of the police | पोलिसांचा वसुलीवरच अधिक भर

पोलिसांचा वसुलीवरच अधिक भर

Next
ठळक मुद्देवाहतूक नियंत्रणाकडे दुर्लक्ष वाहनधारक कंटाळले; तक्रारी वाढल्याएकेका चौकात सात ते आठ कर्मचारी

आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि.५ : शहरातील वाहतूक नियंत्रणासाठी जिल्हा व शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी रस्त्यावर उतरले असले तरी प्रत्यक्षात या कर्मचाऱ्यांकडून मुळ वाहतूक नियंत्रण सोडून वसुलीवरच अधिक भर दिला जात असल्याच्या तक्रारी शहरातील अनेक नागरिक व वाहनधारकांनी ‘लोकमत’ कडे केल्या आहेत.
वाढत्या तक्रारी लक्षात घेता पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी जिल्हा वाहतूक शाखेच्या ६८ कर्मचाºयांना शहर वाहतुकी शाखेत जमा करुन त्यांना शहरातील वाहतूक नियंत्रणासाठी जुंपले. एकेका चौकात जिल्हा व शहर अशा दोन्ही शाखांचे सात ते आठ कर्मचारी दिसून येत असल्याने वाहनधारक कमालीचे धास्तावले आहेत. प्रत्येक दुचाकी व संशयास्पद चार चाकी व रिक्षांना थांबवून कागदपत्रांची तपासणी करण्यात येत आहे. वाहनाचे कागदपत्रे जवळ नसले तरी मेमो दिला जात आहे. कार्यालयीन उद्दीष्ट पूर्ण झालेले असेल तर स्वत:साठी चिरीमिरी केली जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
आधी कार्यालयाचे नंतर स्वत:चे उद्दीष्ट
जिल्हा वाहतूक शाखेत कार्यरत असलेले ६८ कर्मचारी शहर वाहतूक शाखेला जमा झाल्याने शहरातील मुख्य रस्ते, चौकात ठिकठिकाणी वाहतूक पोलिसांची संख्या दिसून येत आहे. या सर्व कर्मचाºयांना केसेस करण्याचे उद्दीष्ट देण्यात येते. सुरुवातीला या कर्मचाºयांकडून कार्यालयीन उद्दीष्ट पूर्ण केले जाते, त्यानंतर स्वत:चे उद्दीष्ट पुर्ण करण्यावर भर दिला जातो. दरम्यान, पोलीस दलाची प्रतिमा मलिन करणाºया कर्मचाºयांना अधीक्षकांनी समज द्यावी अशी मागणी वाहनधारकांनी केली आहे.
मजूर व ग्रामीण भागातील वाहनधारक ‘टार्गेट’
वाहतूक पोलिसांकडून ग्रामीण भागातून आलेले तरुण, मजूर व शेतकरी यांनाच ‘टार्गेट’ केले जात आहे. सध्या शाळा प्रवेश व खरीपाच्या तयारीचे दिवस असल्याने शैक्षणिक वस्तु खरेदी, बाजार व बियाणे खरेदीसाठी ग्रामीण भागातून येणाºया वाहनधारकांची संख्या अधिक आहे व त्याचाच गैरफायदा या पोलिसांकडून घेतला जात असल्याचे वाहनधारकांचे म्हणणे आहे.

Web Title: More on the recovery of the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.