जळगावात पोलीस ठाण्यातूनच मोबाईलचोर पसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 01:19 PM2017-08-10T13:19:48+5:302017-08-10T13:20:29+5:30

जिल्हापेठ ठाण्यात दाखल होता गुन्हा : मोबाईलसह घेतले होते ताब्यात

Mobile connection through Jalgaon police station | जळगावात पोलीस ठाण्यातूनच मोबाईलचोर पसार

जळगावात पोलीस ठाण्यातूनच मोबाईलचोर पसार

Next
ठळक मुद्दे 20 हजार रुपये किंमतीचा मोबाईल चोरून नेला होतागुन्ह्याची कबूल देत त्याने चोरीचा महागडा मोबाईल काढून दिला होता़शोधण्यासाठी गुन्हे शोध पथकातील कर्मचारी कामाला

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 10 - मोबाईल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी मोहन प्रकाश भारुडे (वय-19़ रा़कोळीपेठ) याला शनिपेठ पोलिसांनी मंगळवारी सकाळी मोबाईलसह अटक केली़ सकाळी अटक केलेला हा आरोपी सायंकाळी पोलिसांच्या तावडीतून पसार झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी घडली़ दरम्यान याबाबत पोलीस निरिक्षक प्रविण वाडीले यांनी 41 कलमान्वये त्याला अटक करण्यात आली होती, त्यात असलेल्या अधिकारान्वये त्याला सोडून दिल्याचे सांगितल़े 
जामनेर शहरातील इंद्र ललवाणी नगरातील रहिवासी शुभम संजू पाटील (वय-20) हा खाजगी कामासाठी 4 ऑगस्ट रोजी जळगावात आला होता़ काम आटोपून पुन्हा जामनेर जाण्यासाठी दुपारी 12़40 वाजता नवीन बसस्थानकावर आला़ याठिकाणी जामनेर बसमध्ये चढतांना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरटय़ाने शुभमच्या पॅन्टच्या खिशातून 20 हजार रुपये किंमतीचा मोबाईल चोरून नेला होता. याप्रकरणी 8 रोजी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता़
बुधवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास पोलीस निरिक्षक प्रविण वाडीले यांना जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील मोबाईल चोर मोहन भारुडे हा कोळीपेठेत त्याच्या राहत्या घरी असल्याची माहिती मिळाली़ त्यानुसार गुन्हे शोध पथकातील कर्मचा:यांनी त्याला ताब्यात घेतल़े गुन्ह्याची कबूल देत त्याने चोरीचा महागडा मोबाईल काढून दिला होता़ जिल्हापेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली होती़ मात्र त्यापूर्वी भारुडे हा पोलिसांना गुंगारा देत पसार झाला़ त्याला शोधण्यासाठी गुन्हे शोध पथकातील कर्मचारी कामाला होत़े 

Web Title: Mobile connection through Jalgaon police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.