मेहरूण तलावातील पाणी घातक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2017 11:40 AM2017-06-23T11:40:59+5:302017-06-23T11:40:59+5:30

मू.जे. तील प्रयोगशाळेत लोकमतने केली पाण्याची तपासणी

Meherun lake water fatal | मेहरूण तलावातील पाणी घातक

मेहरूण तलावातील पाणी घातक

Next

 ऑनलाईन लोकमत

जळगाव,दि.23 - आवश्यकतेपेक्षा पाच पट गढूळपणा, वाढती क्षारता व ऑक्सिजनचे कमी प्रमाण झाल्याने मेहरूण तलावातील पाणी जीवजंतूसह वनस्पती वाढीसाठी अत्यंत घातक ठरत आहे. अन्नसाखळी विस्कळीत होवून तलावातील जैवविविधतेला धोका निर्माण झाला आह़े नाल्यातील पाण्याप्रमाणे रंग व दरुगधी असलेले हे पाणी आरोग्यास घातक असल्याचेही तपासणीत आढळून आले आह़े 
जलजीव, वनस्पतींना धोकेदायक ठरतेय पाणी
पाण्यातील प्रमाणापेक्षा गढूळपणा जास्त असल्याने पाण्यातील जलजीव, वनस्पतींसाठी आवश्यक सूर्यकिरण तळार्पयत न पोहचल्याने प्रकाश सेंषणाची प्रक्रिया होत नाही़ तसेच पाण्यात विरघळलेला ऑक्सिजन कमी होत असल्यामुळे जीव जंतूचे प्रमाण कमी होतेय़ त्यामुळे त्यांच्यावर अवलंबून असलेले भक्षक यांची संख्या आपोआपच कमी होत असून जलजीवन, अन्नसाखळी विस्कळीत होत आह़े 
फक्त 180 सुक्ष्मजीव आढळले
 पर्यावरणीय दृष्टय़ा 100 मिलीलीटर पाण्यात 500 सूक्ष्मजीवजंतू आवश्यक असताना 180 सुक्ष्मजीव आढळून आल्याने जीवजंतू उत्पत्तीस तसेच त्यांच्या जीवनमानावर अपायकारक ठरत आह़ेजीवजंतू, तसेच वनस्पतीसाठी  पाणी धोकादायक तर आहेच मात्र पिण्याच्या दृष्टीने तलावाच्या पाण्याचा विचार केला ते मानवी आरोग्यसह अपायकारक असल्याचे आढळून आले आह़े 
मेहरुण तलावातील पाणी तळ दिसेल इतपत स्वच्छ असणे आवश्यक आह़े मात्र या तलावातील पाण्याचा  रंग नाल्याच्या पाण्याप्रमाणे काळसर झाला आह़े  
 तलावातील पाण्याला नाल्याच्या पाण्याप्रमाणे दरुगधी आह़े  
 पाण्याचा गढूळपणा हा 5 एनटीयू इतका अपेक्षित आह़े मात्र तलावातील पाण्यातील गढूळपणा प्रमाणापेक्षा पाचपट जास्त म्हणजे 25 एनटीयू असा आह़े  
जीवजंतू उत्पत्तीसाठी तसेच जगण्यासाठी पाण्यातील बायोलॉजीकल ऑक्सिजनचे प्रमाणे 25 मिली ग्राम/ लीटर असे असणे अपेक्षित आह़े मात्र तलावातील पाण्याचे बीओडी केवळ 7़5 मिली ग्रॅम/ लीटर एवढीच आह़े  
क्षारता 300 मिलीग्रॅम/ लीटर असावी़ त्या दृष्टीने तलावातील पाण्याची क्षारता 280 मिली ग्रॅम/ लीटर  आह़े मात्र वाढत्या प्रदूषणामुळे हा आकडा 300 पार करु शकतो़ 
टोटल सॉलिड म्हणजेच कणांचे प्रमाण 500 मिली ग्रॅम/ लीटर असाव़े तलावातील पाण्यातील कणांचे प्रमाण 688़9 मिलीग्रॅम/ लीटर आह़े
जैविक तपासणीत  100 मिली पाण्यात 400 ते 500 सूक्ष्मजीव, जीवजंतू असणे आवश्यक आह़े मात्र तलावाच्या पाण्यात केवळ 180 सूक्ष्मजीव आढळले.
या घटकांची केली तपासणी
‘लोकमत’ने मुळजी जेठा महाविद्यालयातील प्रयोगशाळेत मेहरूण तलावातील 1 लीटर पाण्याची तपासणी केली़ त्यात  जीवजंतू, जलचर प्राण्यासाठी आवश्यक ऑक्सिजनचे प्रमाण, रंग, दरुगधी, गढूळपणा, क्षारता, कण, जैविक तपासणी, मॅग्नेशिअम असे एकूण 18 घटकांची तपासणी केली असता धक्कादायक वास्तव समोर आले आह़े 

Web Title: Meherun lake water fatal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.