एम. एस्सी व मॅनेजमेंटचे पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमात आता मराठीतून

By अमित महाबळ | Published: July 13, 2023 06:50 PM2023-07-13T18:50:11+5:302023-07-13T19:29:52+5:30

विद्यापीठाने या दुहेरी भाषेच्या शिक्षणा संदर्भातील मार्गदर्शक तत्वे विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर केली आहे.

M. Sc and Management Degree, Post Graduate Course now in Marathi | एम. एस्सी व मॅनेजमेंटचे पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमात आता मराठीतून

एम. एस्सी व मॅनेजमेंटचे पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमात आता मराठीतून

googlenewsNext

जळगाव : नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात मातृभाषेतून उच्च शिक्षण देण्यास दिलेले प्रोत्साहन लक्षात घेऊन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील प्रशाळांमधील चार पदव्युत्तर व एक पदवी अभ्यासक्रम या शैक्षणिक वर्षापासून इंग्रजी सोबतच मराठी या मातृभाषेतून शिकविले जाणार आहेत.

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून विद्यापीठ प्रशाळेतील एम. एस्सी. (संगणक शास्त्र), एम. एस्सी. (भूगोल), एम. एस्सी. (गणित), एम.एड. हे चार पदव्युत्तर आणि व्यवस्थापन शास्त्र (बी.बी.ए.)  हा पदवी असे एकूण पाच अभ्यासक्रम इंग्रजीसोबतच मराठीतून शिकता येणार आहेत. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा एक भाग म्हणून केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने मातृभाषेतून शिक्षण देण्यासाठी आग्रह धरला आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने देखील उच शिक्षण संस्थामध्ये त्या त्या मातृभाषेत पाठ्यपुस्तकांच्या निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने (ए.आय.सी.टी)  दिलेल्या माहितीनुसार ८ राज्यांमध्ये १९ अभियांत्रिकी महाविद्यालयांनी सहा मातृभाषांमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण सुरु केले. महाराष्ट्रात ६० विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण मराठीतून घेत आहेत.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांनी  मातृभाषेतून उच्च शिक्षण दिले जावे यासाठी सातत्याने पाठपुरावा केला आणि आग्रह धरला. त्यातूनच आता चार पदव्युत्तर आणि एक पदवी अभ्यासक्रम दुहेरी भाषामधून शिकविले जाणार आहे. या पाच अभ्यासक्रमासाठी त्या त्या प्रशाळांमध्ये सध्या उपलब्ध असलेल्या एकूण जागांच्या २०%  जागा मराठी माध्यमासाठी व उर्वरीत ८०% जागा इंग्रजी माध्यमांसाठी राखीव असतील. 

विद्यापीठाने या दुहेरी भाषेच्या शिक्षणा संदर्भातील मार्गदर्शक तत्वे विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर केली आहे. या संदर्भात प्रा. सतीश कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली प्रा. डी. एच. मोरे, प्रा. एस. आर. थोरात, प्रा. मधुलिका सोनवणे, प्रा. एस. आर. चौधरी व प्रा.जे.बी. नाईक सदस्य असलेल्या समितीने ही मार्गदर्शक तत्वे तयार केली आहेत.

Web Title: M. Sc and Management Degree, Post Graduate Course now in Marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.