Lok Sabha Election 2019 : मतदानाच्या दिवशी असणारे आठवडे बाजार इतर दिवशी भरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 12:21 PM2019-04-20T12:21:20+5:302019-04-20T12:22:56+5:30

जळगावातील विविध ठिकाणचे बाजारही राहणार बंद

Lok Sabha Election 2019: Weeks on the day of voting will be filled on the market the next day | Lok Sabha Election 2019 : मतदानाच्या दिवशी असणारे आठवडे बाजार इतर दिवशी भरणार

Lok Sabha Election 2019 : मतदानाच्या दिवशी असणारे आठवडे बाजार इतर दिवशी भरणार

Next

जळगाव : लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात २३ एप्रिल रोजी होत असलेल्या मतदान होत असल्याने त्या दिवशी असलेल्या आठवडे बाजाराच्या दिवसात बदल करण्यात येणार असून ते इतर सोईच्या दिवशी भरविण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी काढले आहे.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या मतदानाच्या दिवशी चोपडा तालुक्यातील घोडगाव, चुंचाळे, चाळीसगाव तालुक्यातील तळेगाव, पाटणा, उंबरखेड, धरणगाव तालुक्यातील नांदेड, एरंडोल तालुक्यातील कासोदा, रवंजे बु., जामनेर तालुक्यातील नेरी बु., जळगाव तालुक्यातील विदगांव, मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली, बेलसवाडी, चिखली, पाचोरा तालुक्यातील पिंपळगांव (हरेश्वर), बाळद, नांद्रा, रावेर तालुक्यातील खिर्डी, पाल, चिनावल, यावल तालुक्यातील किनगाव बु., नायगाव, बामणोद, वरणगाव नगरपरिषद क्षेत्रात येणारे वरणगाव, जळगाव शहरातील हरिविठ्ठल नगर, सुभाष चौक, बळीराम पेठ, सिंधी कॉलनी, रथ चौक, आणि विविध कॉलन्यांमध्ये भरणारे आठवडे बाजार इतर दिवशी भरविण्यात यावेत असेही डॉ. ढाकणे यांनी स्पष्ट केले आहे.

Web Title: Lok Sabha Election 2019: Weeks on the day of voting will be filled on the market the next day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.