Lok Sabha Election 2019 : १८ दिवसांनंतर एकनाथराव खडसे प्रचारात सक्रिय होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 12:45 PM2019-04-14T12:45:16+5:302019-04-14T12:46:39+5:30

मुक्ताईनगरला दाखल भेटणाऱ्यांची गर्दी

Lok Sabha Election 2019: After 18 days, Ekanavrao Khadse will be active in the campaign | Lok Sabha Election 2019 : १८ दिवसांनंतर एकनाथराव खडसे प्रचारात सक्रिय होणार

Lok Sabha Election 2019 : १८ दिवसांनंतर एकनाथराव खडसे प्रचारात सक्रिय होणार

Next

जळगाव : प्रकृती अस्वस्थामुळे मुंबई येथे उपचार घेत असलेले माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे शनिवारी पहाटे मुक्ताईनगर येथे दाखल झाले. तब्बल १८ दिवसानंतर ते आल्याने मुक्ताईनगरातील त्यांच्या फार्महाऊसवर भेटणाऱ्यांची गर्दी झाली होती. रविवारपासून आपण प्रचारात सक्रिय होणार असल्याचे त्यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.
२६ मार्च रोजी सायंकाळी खडसे हे उपचारासाठी मुंबईला रवाना झाले होते. त्यांच्या स्नुषा खासदार रक्षा खडसे यांनी २८ मार्च रोजी उमेदवारी अर्ज दाखल करताना खडसे अनुपस्थित होते.
सकाळी दाखल
मुंबई येथून दुरांतो एक्सप्रेसने पहाटे तीन वाजेच्या सुमारास खडसे यांचे भुसावळ येथे आगमन झाले. सकाळी १० वाजेपासून पदाधिकाºयांनी भेटीसाठी त्यांच्या फार्म हाऊसवर गर्दी केली होती. लोकसभेच्या रणधुमाळीत गेल्या १८ दिवसापासून ते दूर होते. भेटीसाठी येणाºया कार्यकर्त्यांकडून खडसे हे त्यांच्या गावातील परिस्थिती, मतदानाची तयारी याबाबत माहिती घेत होते. दरम्यान, खडसे यांची शनिवारी ‘लोकमत’ प्रतिनिधीने भेट घेतली असता त्यांनी आता आपली तब्येत सुस्थितीत असून रविवारपासून प्रचारात सक्रिय होणार असल्याचे सांगितले.
भुसावळ रेल्वेस्थानकावर स्वागत
खडसे शनिवारी पहाटे अडीचला भुसावळ येथे दाखल झाले. त्यावेळी त्यांचे रेल्वेस्थानकावर नगराध्यक्ष रमण भोळे, भाजपा सरचिटणीस प्रा.सुनील नेवे, तालुका उपाध्यक्ष सुधाकर जावळे यांनी स्वागत केले. त्यानंतर ते रात्रीच कोथळी येथे रवाना झाले. या वेळी स्थानकावर नगरसेवक गिरीश महाजन वरणगाव येथील नगरसेवक गणेश धनगर, भाजपा तालुकाध्यक्ष सुधाकर जावळे, बबलू माळी, अनिकेत पाटील, प्रशांत पाटील , सुमित बºहाटे आदी उपस्थित होते.

Web Title: Lok Sabha Election 2019: After 18 days, Ekanavrao Khadse will be active in the campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.