‘जिगर’ने धानोरा येथेही केली दोन लाखांची घरफोडी

By admin | Published: April 12, 2017 12:27 AM2017-04-12T00:27:45+5:302017-04-12T00:27:45+5:30

जिगर बोंडारे याने धानोरा (ता.चोपडा) येथेही घरफोडी केलेली असून तेथून दोन लाख रुपयांचा मुद्देमाल लांबविल्याचे उघड झाले

The liver of two lakhs made in 'Jigar' also made at Dhanora | ‘जिगर’ने धानोरा येथेही केली दोन लाखांची घरफोडी

‘जिगर’ने धानोरा येथेही केली दोन लाखांची घरफोडी

Next


जळगाव : पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेला अट्टल गुन्हेगार भूषण उर्फ जिगर रमेश बोंडारे (वय 22 रा.उमाळा, ता.जळगाव) याने धानोरा (ता.चोपडा) येथेही घरफोडी केलेली असून तेथून दोन लाख रुपयांचा मुद्देमाल लांबविल्याचे उघड झाले. दरम्यान, आतार्पयत तीन गुन्ह्यातील 1 लाख 80 हजाराचा मुद्देमाल त्याच्याकडून हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
कुसुंबा येथील योगेश गजाननराव देशमुख यांच्या घराचे कुलूप तोडून 30 हजार रुपये किमतीचा एलसीडी व 12 हजार रुपये रोख चोरुन नेल्याच्या गुन्ह्यात ताब्यात घेतल्यानंतर जिगरने केलेल्या ह्यजिगरबाजह्ण घरफोडय़ांची कबुली दिली आहे.
 दरम्यान, रामकृष्ण पाटील, भगीरथ नन्नवरे, शरद भालेराव,नितीन बाविस्कर, मनोज सुरवाडे आदींचे पथक जिगरला घेऊन मंगळवारी घटनास्थळ पाहण्यासाठी धानोरा येथे गेले होते. न्यायालयाने त्याला 12 एप्रिलर्पयत पोलीस कोठडी सुनावली आहे.  जिगर याच्याकडून तीन नव्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. त्यातील एक दुचाकी कुसुंबा येथील मेडिकल चालकाची आहे तर दुसरी भुसावळ येथील रेल्वे स्थानकाच्या पार्कीगमधून चोरी केली आहे. तिसरी दुचाकी ही नांदगाव येथील रेल्वे स्थानकाबाहेरुन चोरली आहे. त्यात आणखी एका दुचाकीची भर पडली आहे. धानोरा येथे घरफोडी केली त्याआधी त्याने त्याच गावातून दुचाकी लांबवली आहे. याबाबत अडावद पोलीस स्टेशनला गुन्हाही दाखल आहे. दरम्यान, गोलाणी मार्केटजवळ झालेल्या तीन लाखाच्या बॅग चोरणारे आरोपीही निषन्न झाले असून त्यातील एक अट्टल गुन्हेगार आहे.

पाच वर्षात अटक केलेल्या आरोपींची कुंडली

जळगाव उपविभागात वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला दाखल असलेले चोरी, घरफोडी, सोनसाखळी लांबविणे, बॅग लांबविणे, मोबाईल चोरी, दुचाकी चोरी यासारख्या गुन्ह्यात पाच वर्षात अटक केलेल्या आरोपींची उपअधीक्षक सचिन सांगळे यांनी कुंडली काढली आहे. त्यात किरकोळ घरफोडी व दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात स्थानिक आरोपी आहेत.

तर मोठय़ा गुनंमधील आरोपी हे जिलच्या बाहेरचे असल्याचे उघड झाले आहे. खास करुन महामार्ग व मुख्य शहरातील मुख्य मार्गाला लागून असलेल्या ठिकाणीच घरफोडी व मोठय़ा चोरीच्या घटना घडल्या आहेत. चोरी केल्यानंतर तत्काळ शहराबाहेर पडणे चोरटय़ांना सोपे होत असल्याने सांगळे यांनी शहरातील मुख्य मार्ग व महामार्गावरच लक्ष केंद्रीत केले आहे. गस्तीचे नियोजन, संशयास्पद वाहनांची तपासणी व साध्या वेशातील गस्त हे पर्याय अवलंबण्यात येत आहेत.

Web Title: The liver of two lakhs made in 'Jigar' also made at Dhanora

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.