संगीतमय सोहळ््यातून भगवान महावीर स्वामींचे जीवन दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 12:15 PM2019-04-14T12:15:06+5:302019-04-14T12:15:38+5:30

डॉ. संजय मोहाड व सहकाऱ्यांनी सादर केले गायन

The life philosophy of Lord Mahavir Swam from musical ceremony | संगीतमय सोहळ््यातून भगवान महावीर स्वामींचे जीवन दर्शन

संगीतमय सोहळ््यातून भगवान महावीर स्वामींचे जीवन दर्शन

Next

जळगाव : ‘शुभ दिन शुभ घडी आये’ यासह भगवान महावीर यांच्या जीवनावर संगीतबध्द केलेल्या विविध संगीतमय रचनांचा मिलाप असलेल्या ‘नादविधान’ या संगीतमय कार्यक्रमाद्वारे शनिवारी संध्याकाली भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवात थाटात सुरुवात झाली.
सत्य, अहिंसेचा संदेश देणारे भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त श्री सकल जैन भगवान महावीर जनकल्याणक महोत्सव समितीच्यावतीने पाच दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्त १३ रोजी ‘नादविधान’ हा संगीतमय कार्यक्रम झाला. या वेळी संघपती दलुभाऊ जैन, शाकाहार सदाचारचे प्रणेता रतनलाल बाफणा, कस्तूरचंद बाफणा, श्री सकल जैन भगवान महावीर जनकल्याणक महोत्सव समिती प्रमुख अजय ललवाणी, दिलीप गांधी, प्रदीप मुथा, अमर जैन, डॉ. संजय मोहड, मेधा लखपती आदी उपस्थित होते. मान्यवरांच्याहस्ते भगवान महावीर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात येऊन सोहळ््यास सुरुवात झाली.
या कार्यक्रमात औरंगाबाद येथील डॉ. संजय मोहड यांच्यासह १५ जणांनी भगवान महावीर यांच्या संपूर्ण जीवनावर, तत्वावर आधारीत रचना सादर केल्या णमोकार मंत्राने सुरुवात झालेल्या कार्यक्रमात सादर सर्वच रचनांना उपस्थितांनी भरभरु दाद दिली. कार्यक्रमाला शहर व जिल्ह्यातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आज विविध स्पर्धा, नाटिका
१४ रोजी सकाळी ७ ते ८ या वेळेत आर.सी. बाफना स्वाध्याय भवन येथे सामूहिक सामायिक, सकाळी ८ ते साडे नऊ दरम्यान खान्देश सेंट्रलच्या प्रांगणात ट्रेझर हंट स्पर्धा, सकाळी १० वाजता बालगंधर्व नाट्यगृहात ग्रिटिंग कार्ड, स्लोगन, ‘मेरे महावीर’ चारोळी, ३२ आगम कॅलेंडर, माता त्रिशला व भगवान महावीर यांच्या वेशभुषा (फॅन्सी ड्रेस) स्पर्धा होतील. दुपारी दोन वाजता अनुभूती इंग्लिश मीडियम शाळेत (आर.आर. विद्यालयाजवळ) मुलांसाठी ‘भगवान महावीर’ हा अ‍ॅनिमेशन चित्रपट दाखविण्यात येणार आहे. संध्याकाळी साडेसात ते आठ या वेळेत बालगंधर्व नाट्यगृहात संगीतमय भक्ती आराधना, रात्री ८ ते १० या वेळेत ‘शिखर से शिखर तक’ या विषयावरील धन्ना शालिभद्र ही नाटिका सादर केली जाणार आहे. यासह चार दिवस विविध कार्यक्रम होणार असून उपस्थितीचे आवाहन श्री सकल जैन भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
 

Web Title: The life philosophy of Lord Mahavir Swam from musical ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव