चाळीसगाव तालुक्यात व्हीव्हीपॅट यंत्र जनजागृती मोहिमेस सुरवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 03:01 PM2019-03-12T15:01:31+5:302019-03-12T15:07:33+5:30

निवडणूक कार्यालयाकडून चाळीसगाव तालुक्यात सोमवारपासून व्हीव्हीपॅट यंत्राबाबत जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे.

The launch of VVPatra Janajruti campaign in Chalisgaon taluka | चाळीसगाव तालुक्यात व्हीव्हीपॅट यंत्र जनजागृती मोहिमेस सुरवात

चाळीसगाव तालुक्यात व्हीव्हीपॅट यंत्र जनजागृती मोहिमेस सुरवात

Next
ठळक मुद्देमतदान प्रक्रियेत पारदर्शकतेसाठी इव्हीएम यंत्रासोबत व्हीव्हीपॅट यंत्रही जोडणारकोणाला मतदान केले हे समजणार सात सेकंदात२१ दिवस चालणार मोहीम

चाळीसगाव, जि.जळगाव : निवडणूक कार्यालयाकडून चाळीसगाव तालुक्यात सोमवारपासून व्हीव्हीपॅट यंत्राबाबत जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच व्हीव्हीपॅट यंत्राचा वापर करण्यात येणार आहे. निवडणूक काळात इव्हीएम यंत्राबाबतचे सर्व गैरसमज दूर करुन मतदान प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी इव्हीएम यंत्रासोबत व्हीव्हीपॅट यंत्रही जोडण्यात येणार आहे. या यंत्रामुळे मतदाराला आपले मत कुणाला गेले याबाबत खात्री करता येणार आहे. यापूर्वी इव्हीएम मशिनद्वारे मतदान केल्यानंतर मतदाराला फक्त बीफ आवाज ऐकायला येत होता. आता मात्र मतदाराने कोणाला मतदान केले हे व्हीव्हीपॅट यंत्रावर सात सेकंदापर्यंत दिसणार आहे. निवडणूक कार्यालयाकडून चाळीसगाव तालुक्यात सोमवारपासून व्हीव्हीपॅट यंत्राबाबत जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे.
या मोहिमेंतर्गत कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, ग्रामसेवक यांची चार पथके तयार करण्यात आली आहेत. प्रत्येक पथकात चार कर्मचारी व एक पोलीस कर्मचारी आहे. २१ दिवस चालणाऱ्या या मोहिमेत चार पथकांमार्फत चाळीसगाव तालुक्यातील ३३९ मतदान केंद्रांतर्गत १३७ गावांमध्ये मतदान केंद्र, शैक्षणिक संस्था, सार्वजनिक ठिकाणी जनतेला व्हीव्हीपॅट यंत्राचे प्रात्यक्षित करुन दाखविण्यात येणार आहे.
या पथकातील कृषी पर्यवेक्षक व ग्रामसेवकांना तहसील कार्यालयात नायब तहसीलदार विशाल सोनवणे यांनी व्हीव्हीपॅट यंत्राचे प्रात्यक्षित करुन दाखविले. यावेळी व्हीव्हीपॅट यंत्रात कागदाचा रोल कसा लावावा, इव्हीएम व व्हीव्हीपॅट यंत्राची बॅटरी कशी बदलावी, व्हीव्हीपॅट यंत्र ईव्हीएम यंत्राला कसे जोडावे याबाबत प्रात्यक्षिक करुन दाखविले. यंत्राचे प्रात्यक्षित दाखविताना ते उन्हात ठेवू नये, तसेच व्हीव्हीपॅट यंत्रावर कोणतीही त्रुटी आढळल्यास त्वरीत निवडणूक कार्यालयाशी संपर्क साधावा, अशा सूचनाही तहसीलदार अमोल मोरे यांनी संबंधितांना दिल्या.

Web Title: The launch of VVPatra Janajruti campaign in Chalisgaon taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.