यावल येथे शेतकरी संघात हमी भावात धान्य खरेदी केंद्राचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2018 12:52 AM2018-12-02T00:52:59+5:302018-12-02T00:53:59+5:30

यावल, जि.जळगाव : तालुका शेतकरी संघात यावल कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत शासकीय हमी भावात धान्य खरेदी केंद्राचा शुभारंभ १ ...

Launch of grain procurement center at Yaval in Farmer's team | यावल येथे शेतकरी संघात हमी भावात धान्य खरेदी केंद्राचा शुभारंभ

यावल येथे शेतकरी संघात हमी भावात धान्य खरेदी केंद्राचा शुभारंभ

Next
ठळक मुद्दे२१ नोव्हेंबरपर्यंत ३८२ शेतकऱ्यांनी केली आॅनलाईन नोंदणी८०० एकरमधील ज्वारी, ११७ एकर क्षेत्रातील मका खरेदी होण्याचा अंदाजज्वारी खरेदीचा शासकीय हमी भाव प्रतिक्विंटल दोन हजार चारशे तीस रुपये, मका प्रति क्विंटल एक हजार ७०० रुपये दराने खरेदी केला जाणार

यावल, जि.जळगाव : तालुका शेतकरी संघात यावल कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत शासकीय हमी भावात धान्य खरेदी केंद्राचा शुभारंभ १ रोजी आमदार हरिभाऊ जावळे यांच्या हस्ते तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती भानुदास चोपडे, तहसीलदार कुंदन हिरे यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
शासकीय हमी भावात धान्य खरेदी शुभारंभाप्रसंगी आमदार हरिभाऊ जावळे यांनी तालुक्यातील सिरसाड येथील शेतकरी पंढरीनाथ इच्छाराम भिरुड यांची ज्वारी प्रतिक्विंटल दोन हजार चारशे तीस रुपये दराने शासकीय हमी भावात खरेदी केली. यासोबत राकेश वसंत फेगडे, विजय रामदास फेगडे, शशिकला वसंत फेगडे (रा.कोरपावली) व स्वप्नील शिवाजी मराठे (रा.शिरसाड) या पाच जणांची अनुक्रमे ज्वारी खरेदी करण्यात आली. २१ नोव्हेंबरपर्यंत एकूण ३८२ शेतकºयांनी यावल कृषी उत्पन्न बाजार समितीत आॅनलाईन नोंदणी केली आहे. यात अंदाजे ८०० एकरमधील ज्वारी, ११७ एकर क्षेत्रातील मका खरेदी होणार असल्याचा अंदाज आहे, ज्वारी खरेदीचा शासकीय हमी भाव प्रतिक्विंटल दोन हजार चारशे तीस रुपये, मका प्रति क्विंटल एक हजार ७०० रुपये दराने खरेदी केला जाणार आहे. ज्वारी मका खरेदी करताना चांगल्या प्रतीच्या धान्याला प्राधान्य मिळणार आहे.
उद्घाटनप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती कांचन फालक, सभापती भानुदास चोपडे, संचालक मुन्ना उर्फ तुषार पाटील, जिल्हा बँक संचालक गणेश गिरधर नेहेते, माजी संचालक प्रशांत लीलाधर चौधरी, कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती नितीन चौधरी, शेतकी संघाचे संचालक तथा जिल्हा परिषद गटनेते प्रभाकर सोनवणे, माजी जिल्हा परिषद सदस्य हर्षल पाटील, शेतकी संघाचे मॅनेजर गाजरे, शेतकी संघाचे संचालक नरेंद्र विष्णू नारखेडे, कोरपावली विकासो चेअरमन राकेश फेगडे, गोपालसिंग पाटील, वसंतराव भोसले, विलास पाटील, विलास चौधरी, उज्जैनसिंग राजपूत यांच्यासह ग्रेडर राजेंद्र महाजन, तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Launch of grain procurement center at Yaval in Farmer's team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.