वीर जवान जितेंद्र पाटीलला धरणगाव येथे "अमर रहे"च्या जयघोषाने अखेरचा निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2018 10:21 PM2018-11-08T22:21:00+5:302018-11-08T22:21:02+5:30

जम्मू-काश्मीर येथे कर्तव्य बजावत असताना वीर मरण आलेल्या आर्मीच्या जवान जितेंद्र मोहन पाटील (पानपाटील) यांना ८ रोजी धरणगावला भव्य "शहीद मिरवणूक" काढून अखेरचा निरोप देण्यात आला.

The last word of the death of "Amar Rahe" in Dharnagaon, Veer Jawan, Jitendra Patil | वीर जवान जितेंद्र पाटीलला धरणगाव येथे "अमर रहे"च्या जयघोषाने अखेरचा निरोप

वीर जवान जितेंद्र पाटीलला धरणगाव येथे "अमर रहे"च्या जयघोषाने अखेरचा निरोप

googlenewsNext

जळगाव (धरणगाव)- जम्मू-काश्मीर येथे कर्तव्य बजावत असताना वीर मरण आलेल्या आर्मीच्या जवान जितेंद्र मोहन पाटील (पानपाटील) यांना ८ रोजी धरणगावला भव्य "शहीद मिरवणूक" काढून अखेरचा निरोप देण्यात आला. या मिरवणुकीत महिलांसह गर्दीचा पूर लोटला होता. शहीद जवान अमर रहे च्या जयघोषाने शहर दणाणून गेले होते. त्यामुळे राष्ट्रभक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
रहिवासी तथा गेल्या १५ वर्षापासून आर्मीत सेवा बजावणाय्रा वीर जवान जितेंद्र मोहन पाटील हे जम्मू-काश्मीर मध्ये सेवा बजावताना ५ रोजी मृत्यू झाल्यानंतर ८ रोजी त्यांचे पार्थीव धरणगावला आणण्यात आले. नगरपालीकेच्या व नगरवासीयांच्या सहकार्याने भव्य रामरथ सजविण्यात आले होते. मार्गावर रांगोळ्या व फुलांचे आच्छादन करण्यात आले होते. येथील एरंडोल रोडवरील साईबाबा नगर मधून त्यांची शहीद अंत्ययाञा मिरवणूक काढण्यात आली. उड्डाण पुलावरून बाबासाहेब आंबेडकर व छञपती शिवराय यांच्या पुतळ्यांना भेटी देऊन अमरधामात  "शहीद जवान अमर रहे" या जयघोषाने नेण्यात आले. शहीद जितेंद्र पाटील यांना मानवंदना देवून पुष्पचक्र अर्पण केले. पोलिसांनी तीन फैरी झाडून सलामी दिली. यावेळी प्रशासनातर्फे प्रांताधिकारी विजयानंद शर्मा यांनी शोकभावना व्यक्त केली.तसेच  सहकार राज्य मंञी गुलाबराव पाटील, माजी मंञी गुलाबराव देवकर, डी.जी.पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, समरसता मंचचे प्रांत संघटक प्रा.रमेश महाजन,भाजपाचे तालुका अध्यक्ष संजय महाजन, माजी नगराध्यक्ष पी.एम.पाटील यांनी शोक भावना व्यक्त करुन शहीद जितेंद्र हे तालुक्याचा नव्हे तर देशाचा अभिमान असल्याचे मत व्यक्त केले. धरणगाव शहरात पहिल्यांदाच शहीद मिरवणूक निघाल्याने शहरातील अबाल वृद्धांनी, महिलांनी यात सहभाग नोंदविला. नगरपालिका, नगरसेवक व विविध संस्था, संघटनांनी या मिरवणुकीवर पुष्षवृष्टी केल्याने रस्त्यावर फुलांचा खच पडला होता. शहीद अमर रहेच्या जयघोषाने शहर दणाणले होते.

Web Title: The last word of the death of "Amar Rahe" in Dharnagaon, Veer Jawan, Jitendra Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.