जळगावात सट्टा अड्यावर रात्री धाड, २८ जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 01:02 PM2018-08-31T13:02:27+5:302018-08-31T13:03:22+5:30

अपर पोलीस अधीक्षकांची कारवाई

Last night, 28 people arrested in connection with speculation in Jalgaon | जळगावात सट्टा अड्यावर रात्री धाड, २८ जणांना अटक

जळगावात सट्टा अड्यावर रात्री धाड, २८ जणांना अटक

Next
ठळक मुद्देएमआयडीसी पोलिसांना खबर नाहीबिसमिल्ला चौक, महादेव मंदिर परिसरात धाड

जळगाव : अपर पोलीस अधीक्षक लोहीत मतानी यांनी गुरुवारी रात्री ९ वाजता एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत चार ठिकाणी सुरु असलेल्या सट्टा अड्डयावर धाड टाकली. त्यातील एक अड्डा एका नवनिर्वाचित नगरसेवकाचा असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सट्टा घेणारे व खेळणारे अशा एकूण २८ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ४२ हजार ४९८ रुपये रोख, १० मोबाईल व जुगाराचे साहित्य असा ९२ हजार ९९७ रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.
बिसमिल्ला चौक, महादेव मंदिर परिसरात धाड
अपर पोलीस अधीक्षक मतानी यांनी गुरुवारी रात्री २० ते २५ जणांच्या शीघ्र कृती दलाच्या राखीव जवानांच्या ताफ्यासह महामार्गाला लागून असलेल्या शेरा चौकात धडकले. तेथून तांबापुरातील बिसमिल्ला चौक, महादेव मंदिर अशा ठिकाणी पोलिसांचे पथक पोहचले. पोलिसांचा ताफा पाहून सर्वत्र पळापळ झाली. मात्र २८ जणांना पकडण्यात पथकाला यश आले. अपर पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याने स्वत: जावून केलेली पहिलीच कारवाई आहे. काही वर्षापूर्वी तत्कालीन पोलीस अधीक्षक इशू सिंधू यांनी कारवाई केली होती.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये हेमंत जगन्नाथ नाथ, विकास रमेश सोनवणे, रफिक गनी तांबोळी, फिरोज शेख सलीम, शेख रशीद शेख रहेमद मिस्तरी, किशोर बळीराम सपकाळे, शेख मोईम हुसेन शेख, सलीम शेख रशीद शेख, गणेश कैलास शिवदे, रामलाल दामू शिंदे, राजेश साहेबराव सुतार, सिकंदर गफ्फार पटेल, नामदेव त्र्यंबक चव्हाण, आसान शेख जहांगीर व कदीर शेख कबीर यांच्यासह २८ जणांचा समावेश आहे.
अपर पोलीस अधीक्षक लोहीत मतानी, सहायक निरीक्षक जी. पी. गांगुर्डे, सुनील दामोदरे, दीपक शिंदे, प्रशांत साळी, रफीक शेख कालू यांच्यासह पथकाने ही कारवाई केली. दरम्यान, या कारवाईमुळे अवैध धंदे चालक व धंद्यांना प्रोत्साहन देणाºया पोलिसांचे धाबे दणाणले आहे
एमआयडीसी पोलिसांना खबर नाही
ही कारवाई करताना एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या एकाही अधिकारी अथवा कर्मचाºयाला सोबत घेण्यात आले नव्हते. त्यांना या कारवाईची खबरच मिळाली नाही. मतानी आरोपींची जत्रा घेऊन थेट पोलीस स्टेशनलाच दाखल झाले. पोलीस निरीक्षकासह सर्वच कर्मचारी अवाक् झाले.

Web Title: Last night, 28 people arrested in connection with speculation in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.