जळगावात शीतपेटीच्या सुविधेने सुकर झाला ‘अंतिम प्रवास’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 12:30 PM2018-10-14T12:30:40+5:302018-10-14T12:32:44+5:30

जळगाव डिस्ट्रीक्ट मेडिसीन डिलर असोसिएशनतर्फे अनोखी सेवा

'Last Migration' facilitated with cold storage | जळगावात शीतपेटीच्या सुविधेने सुकर झाला ‘अंतिम प्रवास’

जळगावात शीतपेटीच्या सुविधेने सुकर झाला ‘अंतिम प्रवास’

Next
ठळक मुद्देसामाजिक दायित्व३२ शीतपेटींद्वारे जिल्हाभरात सेवा

विजयकुमार सैतवाल
जळगाव : जीवनातील चढ-उताराचा संघर्षमय प्रवास करून मृत्यूनंतर अंतिम प्रवासाला निघालेल्या व्यक्तीच्या देहाची शीतपेटीच्या सुविधेमुळे अवहेलना थांबून अंंतिम प्रवासही सुकर झाल्याचे दिलासादायक चित्र जळगाव जिल्ह्यात निर्माण झाले आहे. जळगाव डिस्ट्रीक्ट मेडिसीन डिलर असोसिएशनतर्फे दिल्या जाणाऱ्या या अनोख्या मोफत सेवेचा दर महिन्याला साधारण पाचशेच्यावर कुटुंबीयांना लाभ मिळत आहे.
गोर-गरीब असो की श्रीमंत, प्रत्येकाच्या जीवनात चढ-उतार येऊन विविध प्रसंगामुळे जीवन संघर्षमय असल्याचेच प्रत्येक जण सांगतो. जीवनातील या संघर्षानंतर मृत्यूपश्चात प्रत्येकाच्या देहाची अवहेलना न होता शेवटचा हा प्रवास तरी सुखकर व्हावा, अशी अपेक्षा प्रत्येकाच्या कुटुंबीयांची असते. मात्र बºयाचवेळी मृत्यूनंतर मृतदेह काही दिवस ठेवायची वेळ आली तर मृतदेह चांगला राहून त्याची अवहेलनाही होऊ नये म्हणून जळगाव डिस्ट्रीक्ट मेडिसीन डिलर असोसिएशनने पुढाकार घेतला असून गेल्या पाच वर्षांपासून संघटनेमार्फत अनोखी सेवा देत मृतदेह ठेवण्यासाठी मोफत शीतपेटी उपलब्ध करून दिली जात आहे.
असा आकाराला आला उपक्रम
जिल्ह्यातील एका औषध विक्रेत्याच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी संघटनेचे पदाधिकारी पोहचले. त्या ठिकाणी हा मृतदेह बर्फावर ठेवलेला होता व बर्फाचे पाणी होऊन ते सर्वत्र पसरले होते आणि घरातील सदस्य ओले झाले होते. त्यावेळी हा प्रसंग पाहून अशी वेळ कोणावरही येऊ नये म्हणून संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील भंगाळे यांनी मृतदेह ठेवण्यासाठी शीतपेटीची सोय उपलब्ध करून देण्याचे ठरविले. त्यानुसार त्यांनी संघटनेतील पदाधिकाºयांना ही गोष्ट बोलून दाखविली व सर्व जण तयार झाले.
३२ शीतपेटींद्वारे जिल्हाभरात सेवा
२०१३मध्ये या उपक्रमास सुरुवात केली त्या वेळी जिल्ह्यात इतर संस्थांच्या केवळ तीनच शीतपेट्या होत्या. त्याचा तपास काढला असता एका पेटीची किंमत सव्वा लाख रुपये होती. मात्र तरीही संघटना मागे फिरली नाही. त्यांनी जळगावातील राजेंद्र पाटील या तरुणाकडून प्रायोगिक तत्वावर ३५ हजार रुपयांना एक शीतपेटी तयार करून घेतली. ती व्यवस्थित असल्याचे लक्षात आल्यानंतर संघटनेने आणखी ३१ शीतपेटी तयार करून घेतल्या. त्यात राजेंद्र पाटील यांनीही ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर सामाजिक बांधीलकी जपत या कामात आपलाही वाटा असावा म्हणून ३५ ते ४० हजारात एक शीतपेटी तयार करून दिली. त्यानुसार जळगाव शहरात सात व ग्रामीण भागात २५ अशा एकूण ३२ शीतपेटींद्वारे संघटना मोफत शीतपेटीची सुविधा देत आहे.
दररोज कमी पडतात शीतपेटी
जळगाव शहरात असलेल्या सात शीतपेटींना दररोज वेगवेगळ््या ठिकाणी मागणी असते. कधी-कधी तर एका ठिकाणाहून परत आणल्यानंतर पुन्हा लगेच दुसºया ठिकाणी ती शीतपेटी जाऊन एकेका शीतपेटीचा दिवसातून दोन वेळा उपयोग केला जातो. त्यामुळे महिनाकाठी साधारण पाचशेच्यावर कुटुंबीयांना या शीतपेटींचा लाभ होत आहे.
असा घ्या लाभ
जळगाव शहरात केमिस्ट भवन येथे या शीतपेटी ठेवलेल्या असून तेथे संपर्क साधल्यास मागेल त्याला ती उपलब्ध करून दिली जाते. गरज पडल्यास कोणीही येऊन या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन अध्यक्ष सुनील भंगाळे यांनी केले आहे.
सेवेसाठी यांचे सहकार्य
या सेवेसाठी सुनील भंगाळे यांच्यासह अनिल झवर, श्याम वाणी, ब्रिजेश जैन, दिनेश मालू, जगदीश पलोड, अमित चांदीवाल, संजय तिवारी, धनंजय तळेले, विलास नेहेते, सुरेश कुकरेजा, मोहन भागवानी, इरफान सालार, लखीचंद जैन आदींनी सहकार्य केले.

Web Title: 'Last Migration' facilitated with cold storage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.