चाळीसगाव येथील तरुणाचे अपहरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 05:42 PM2019-01-19T17:42:02+5:302019-01-19T17:43:33+5:30

चाळीसगाव , जि.जळगाव : काहीतरी कारणावरून पाच ते सहा जणांच्या टोळक्याने मार्बल व्यापाºयाच्या १९ वर्षीय पुतण्याला बेदम मारहाण करीत ...

Kidnapping of a youth in Chalisgaon | चाळीसगाव येथील तरुणाचे अपहरण

चाळीसगाव येथील तरुणाचे अपहरण

Next
ठळक मुद्देपाच जणांविरुद्ध गुन्हाअपहरणाचे कारण अज्ञातमारहाण करीत सायंकाळी कारमधून नेले पळवूनअपहृत तरुण मार्बल व्यापाऱ्याचा पुतण्या

चाळीसगाव, जि.जळगाव : काहीतरी कारणावरून पाच ते सहा जणांच्या टोळक्याने मार्बल व्यापाºयाच्या १९ वर्षीय पुतण्याला बेदम मारहाण करीत कारमधून पळवून नेत अपहरण केले. हा खळबळजनक प्रकार शहरातील डेराबर्डी भागात राणीपार्क हॉटेलजवळ १८ रोजी सायंकाळी ७ .३० वाजता घडला. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेची माहिती अशी की, राजस्थानातील ढाणी, मु.पो.बाणोरा, ता.दातारामगड, जि. सिकर येथील रहिवासी गुलाबचंद हिरालालजी जांगीड हे गेल्या १५-२० वर्षांपासून चाळीसगाव येथे ग्रेनाईड खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात.
धुळे रोडवरील मानराज मोटार्सजवळ त्यांचे मार्बलचे दुकान आहे. काही दिवसांपूर्वी ते मूळ गावी गेले असता त्यांचा मोठा भाऊ मदनलाल यांनी त्यांचा मुलगा गजनन मदनलाल जांगीड (वय १९) याला त्याचे मित्र विनाकारण त्रास देत असतात. त्यामुळे त्याला चाळीसगाव येथे घेऊन जा, असे सांगितले. तेव्हापासून मदनलाल यांची दोन्ही मुले ही गुलाबचंद यांच्याकडे व्यवसायात मदत करण्यासाठी चाळीसगावी असतात.
१८ रोजी गजानन यास घरी काही कामासाठी पाठवले. घरून तो पुन्हा दुकानात जात असताना सायंकाळी साडेसातच्या सुमारास राणीपार्क हॉटेलसमोर रमेश जाखड, बलबीर जाखड व त्यांचे इतर दोन ते तीन मित्र यांनी गजानन यास मारहाण केली व डब्ल्यूबी-०६-०४४१ या कारमध्ये बळजबरीने टाकून त्याचे अपहरण करून धुळ्याच्या दिशेने पळवून नेले. टोळक्याने ज्या वाहनातून गजानन याचे अपहरण करून पळवून नेले ती कार दिवसभर काम करण्यासाठी मानराज मोटर्स येथे लावलेली होती. मानराज मोटार्समधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही बाब उघड झाली असून, पाच जण ती कार घेऊन आले होते. अपहरण केल्याची माहिती मिळाल्यानंतर गुलाबचंद जांगीड यांनी या कारचा धुळ्यापर्यत पाठलाग करून शोध घेतला पण मिळून आली नाही. त्यामुळे त्यांनी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन पुतण्या गजानन जांगीड याला मारहाण करून त्याचे वाहनातून अपहरण केल्याप्रकरणी रमेश जाखड, बलराज जाखड यांच्यासह पाच जणांच्या विरोधात फिर्याद दिली. याप्रकरणी शहर पोलिसात पाच ते सहा जणांविरोधात भा.दं.वि. कलम ३६३, ३२३, ३४ कलमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक मच्छिंद्र रणमाळे हे करीत आहेत.

Web Title: Kidnapping of a youth in Chalisgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.