अखर्चिक निधी ठरणार ‘डीपीडीसी’त कळीचा मुद्दा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 11:53 AM2019-07-18T11:53:12+5:302019-07-18T11:53:53+5:30

अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

The key issue in the DPDC will be the funding of the National Capital Region | अखर्चिक निधी ठरणार ‘डीपीडीसी’त कळीचा मुद्दा

अखर्चिक निधी ठरणार ‘डीपीडीसी’त कळीचा मुद्दा

Next

जळगाव : जिल्हा नियोजन विकास समितीची (डीपीडीसी) १९ रोजी बैठक होणार असून यामध्ये विविध विभागांच्या परत गेलेला निधी कळीचा मुद्दा ठरून त्यावरून ही बैठक गाजण्याची शक्यता आहे. दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील जिल्हा नियोजन भवनात पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. त्याचा बुधवारी प्रभारी जिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी आढावा घेतला.
जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन यांची निवड झाल्यानंतर त्यांच्या अध्यक्षतेखाली डीपीडीसीची ही पहिलीच बैठक असून विविध विभागांच्या परत गेलेल्या निधीवरून विशेषत: जिल्हा परिषदेकडे असलेल्या अखर्चिक निधीवरून ही बैठक गाजण्याची शक्यता आहे.
या बैठकीत ८ मार्च रोजी झालेल्या बैठकीच्या इतिवृत्तास मान्यता देण्यासह २०१८-१९ या वर्षातील वार्षिक योजनांच्या खर्चाचा आढावा घेणे, २०१९-२० या वर्षासाठीच्या योजनांचे नियोजन करणे व आयत्या वेळी येणाºया विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे.
दरम्यान, ही बैठक अगोदर २० जुलै रोजी घेण्याचे नियोजन होते. मात्र काही कारणास्तव ती आता १९ रोजी होणार आहे.

Web Title: The key issue in the DPDC will be the funding of the National Capital Region

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव