जामनेरचे दोन तरुण अपघातात ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 03:57 PM2018-05-18T15:57:50+5:302018-05-18T15:57:50+5:30

शेंदुर्णीला जात होते दोघे : ट्रकचालक फरार

 Jamner's two young men killed in an accident | जामनेरचे दोन तरुण अपघातात ठार

जामनेरचे दोन तरुण अपघातात ठार

Next

आॅनलाईन लोकमत
जामनेर, जि.जळगाव : येथून शेंदुर्णीकडे दुचाकीने जात असलेल्या दोघांना समोरुन भरधाव वेगाने येत असलेल्या ट्रकने धडक दिल्याने एक जागीच ठार झाला, तर दुसऱ्यास जळगाव येथे उपचारास नेत असताना त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात शहराजवळील रेल्वे गेटजवळ शुक्रवारी रात्री साडेबाराच्या सुमारास घडला. सुनील मधुकर मराठे (वय ३२, रा.विवेकानंद नगर, जामनेर) व गजानन काळू कोकाटे (वय ३२, रा.श्रीराम पेठ, जामनेर) असे अपघातातील मृतांची नावे आहेत.
अपघातानंतर चालक ट्रक सोडून फरार झाला. गंभीर जखमी अवस्थेतील गजानन यास उपचारासाठी जळगावला नेत असताना त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. अपघाताची माहिती मिळताच रात्रीच पोलिस घटनास्थळी पोहचले. घटनेची माहिती शहरात समजताच मृतांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. विवेकानंद नगर व श्रीराम पेठ परिसरात शोककळा पसरली आहे. भिका कोकाटे यांच्या फिर्यादीवरुन ट्रक (क्रमांक एमएच-१९-झेड-५०६१) च्या चालकाविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस उपनिरीक्षक विकास पाटील तपास करीत आहे.

Web Title:  Jamner's two young men killed in an accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.