जामनेर तालुक्यात मकाचे क्षेत्र घटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 03:03 PM2019-06-19T15:03:18+5:302019-06-19T15:05:59+5:30

जामनेर तालुक्यात गेल्या रबी हंगामात मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुभार्वास सुरुवात झाल्याने या वर्षाच्या खरीप हंगामात मागील वर्षीच्या तुलनेत मका पिकावरील जवळपास १० टक्के पिकपेरा घटून कापूस पीकपेरा वाढणार असल्याची माहिती कृषी अधिकारी यांनी दिली.

In Jamner taluka, maqa area will be reduced | जामनेर तालुक्यात मकाचे क्षेत्र घटणार

जामनेर तालुक्यात मकाचे क्षेत्र घटणार

Next
ठळक मुद्देकापूस, कडधान्य वाढणारप्रतीक्षा पावसाचीमशागतीच्या कामांना वेग!

जामनेर, जि.जळगाव : तालुक्यात गेल्या रबी हंगामात मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुभार्वास सुरुवात झाल्याने या वर्षाच्या खरीप हंगामात मागील वर्षीच्या तुलनेत मका पिकावरील जवळपास १० टक्के पिकपेरा घटून कापूस पीकपेरा वाढणार असल्याची माहिती कृषी अधिकारी यांनी दिली.
सध्या पाण्याच्या कमतरतेमुळे बागायती कपाशी लागवडीवरही याचे परिणाम झाले आहेत.
दरम्यान, खरीप हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपल्याने शेतकरी आता नव्या उमेदीने पेरणीपूर्वी मशागतीच्या कामाला लागले आहेत. तालुक्यात आर्थिक गाडा प्रामुख्याने शेतीवर अवलंबून आहे तालुक्यात एकूण १ लाख ९५२ हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी जवळपास ९३ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामाची लागवड होते. खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर आला असून शेतात सध्या शेणखत टाकणे, शेताला कुंपण करणे, काडी कचरा उचलणे, नांगरणे, कुळवाच्या पाळ्या देणे, ठिबंक टाकणे आदी कामे गतीने सुरु आहे .या अगोदर लग्णसराई जोरात होती. त्यामुळे शेताच्या मशागतीच्या कामांना विलंब झाला.
कापूस क्षेत्र वाढणार?
तालुक्यातील कपाशीचे क्षेत्र १० टक्क्यांनी वाढेल व मका क्षेत्र घटेल गेल्या वर्षी खरीप हंगामात तालुक्यात ६० हजार हेक्टरवर कापसाची लागवड करण्यात आली होती. आता ६२ हजार ७४० हेक्टरवर कापसाची लागवड होणार आहे. तसेच मका १८ हजार ७६२ हेक्टर, ज्वारी ३ हजार १४० हेक्टर, तुर ४ हजार १२० हेक्टर, मूग २ हजार ११५ हेक्टर, उडीद १ हजार ८५० हेक्टर आदी लागवडीची शक्यता आहे .

कृषी विभागाकडून तालुक्यासाठी खते व बी बीयाणांचे योग्य नियोजन करण्यात आले आहे. मुबलक प्रमाणात बियाणे उपलब्ध राहतील कमतरता भासणार नाही. शेतकऱ्यांनी पेरणीच्या योग्य काळातच पेरणी करावी. तसेच जमिनीमध्ये पुरेसा ओलावा झाल्यानंतरच कापसाची लागवड करावी. बियाणे खरेदी करताना विक्रेत्याकडून पक्के बील घ्यावे.
-रमेश जाधव, कृषी अधिकारी जामनेर
 

Web Title: In Jamner taluka, maqa area will be reduced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.