जळगावातील हुडको भागात तरुणाच्या डोक्यात घातला कोयता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 04:59 PM2018-02-08T16:59:24+5:302018-02-08T17:00:58+5:30

भाचीला शिवीगाळ का करतो याचा जाब विचारणाºया विनोद गोविंदा बिºहाडे (वय १८ रा.हुडको, पिंप्राळा, जळगाव) या तरुणाच्या डोक्यात ईश्वर मोरे याने कोयता मारुन गंभीर जखमी केल्याची घटना गुरुवारी दुपारी साडे तीन वाजता पिंप्राळा, हुडकोत घडली.

in Jalgaon was put on the head of a young man | जळगावातील हुडको भागात तरुणाच्या डोक्यात घातला कोयता

जळगावातील हुडको भागात तरुणाच्या डोक्यात घातला कोयता

Next
ठळक मुद्देभाचीला शिवीगाळ का करतो याचा जाब विचारल्याने आला रागपिंप्राळा हुडकोतील गुरुवारी दुपारी साडे तीन वाजेची घटनाहल्ल्यात विनोद बिºहाडे हा तरुण गंभीर जखमी

आॅनलाईन लोकमत
जळगाव,दि.८- भाचीला शिवीगाळ का करतो याचा जाब विचारणा-या विनोद गोविंदा बि-हाडे (वय १८ रा.हुडको, पिंप्राळा, जळगाव) या तरुणाच्या डोक्यात ईश्वर मोरे याने कोयता मारुन गंभीर जखमी केल्याची घटना गुरुवारी दुपारी साडे तीन वाजता पिंप्राळा, हुडकोत घडली.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, ईश्वर मोरे हा घराशेजारी राहणाºया १२ वर्षाच्या मुलीला अश्लिल शिवीगाळ करीत होता हा प्रकार तिने आई व मामाला सांगितला. त्यामुळे विनोद बि-हाडे हा त्याला जाब विचारायला गेला असता मोरे याने विनोद याच्याशी हुज्जत घातली. घरात जावून ऊस तोडण्याचा कोयता आणला व तो विनोद याच्या डोक्यात घातला. यामुळे रक्तबंबाळ अवस्थेत विनोद घायाळ झाला. त्याला नातेवाईकांनी तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविले. यावेळी महिला नातेवाईक व लहान मुलांचा प्रचंड आक्रोश सुरु होता. दरम्यान, विनोद याच्यावर तातडीची शस्त्रकिया करण्यात आली.

Web Title: in Jalgaon was put on the head of a young man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.