Jalgaon: बनावट कागदपत्रांच्या आधारे सिमकार्ड विक्री, चिनावलच्या विक्रेत्याविरुद्ध गुन्हा

By विजय.सैतवाल | Published: July 14, 2023 02:32 PM2023-07-14T14:32:06+5:302023-07-14T14:32:41+5:30

Jalgaon: बनावट कागदपत्रांच्या आधारे सिमकार्ड विक्री करणारा यावल तालुक्यातील चिनावल येथील विक्रेता अल्तमश (पूर्ण नाव समजू शकले नाही) याच्याविरुद्ध सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Jalgaon: Sale of SIM card based on forged documents, case against seller of Chinawal | Jalgaon: बनावट कागदपत्रांच्या आधारे सिमकार्ड विक्री, चिनावलच्या विक्रेत्याविरुद्ध गुन्हा

Jalgaon: बनावट कागदपत्रांच्या आधारे सिमकार्ड विक्री, चिनावलच्या विक्रेत्याविरुद्ध गुन्हा

googlenewsNext

- विजयकुमार सैतवाल
जळगाव - बनावट कागदपत्रांच्या आधारे सिमकार्ड विक्री करणारा यावल तालुक्यातील चिनावल येथील विक्रेता अल्तमश (पूर्ण नाव समजू शकले नाही) याच्याविरुद्ध सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात दूरसंचार विभागाने सायबर पोलिसांना माहिती कळविल्यानुसार फिर्याद दाखल होऊन गुन्हा दाखल झाला. 

यावल तालुक्यातील चिनावल येथे अल्तमश याचे मोबाईल व सिमकार्ड विक्रीचे दुकान आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे त्याच्याकडून सिमकार्ड विक्री केली जात असल्याची माहिती दूरसंचार विभागाला मिळाली. त्यानुसार या विभागाने जळगाव येथील सायबर पोलिसांना या विषयी कळविले. १० जुलैपूर्वी  त्याने बनावट कागदपत्रांच्या आधारे सिमकार्ड विक्री केल्याची माहिती संबंधित विभागाला मिळाली आहे.   पोहेकॉ वसंत बेलदार यांनी या विषयी फिर्याद दिली. त्यावरून १३ जुलै रोजी रात्री या विक्रेत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक बी.डी. जगताप करीत आहेत.

Web Title: Jalgaon: Sale of SIM card based on forged documents, case against seller of Chinawal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.