जळगावात सट्टापेढीवर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2017 11:53 AM2017-07-28T11:53:28+5:302017-07-28T11:55:17+5:30

परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षकांची कारवाई : 26 जणांना अटक; सव्वा लाखाची रोकड जप्त

jalgaon police rade case | जळगावात सट्टापेढीवर धाड

जळगावात सट्टापेढीवर धाड

Next
ठळक मुद्दे26 जणांना अटक2 लाख 30 हजार 160 रुपयांचा  ऐवज जप्तसर्वात मोठय़ा कारवाईने अवैध धंदे चालकांचे धाबे दणाणले

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 28 -  नेरी नाका स्मशानभूमीच्या मागे ङिापरु अण्णा नगरात सुरु असलेल्या सट्टा पेढीवर परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक धनंजय पाटील यांच्या पथकाने गुरुवारी धाड टाकली. त्यात सट्टा पेढी मालकासह सट्टा खेळणा:या 26 जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 1 लाख 15 हजार 160 रुपये रोख, 20 मोबाईल,  सट्टा जुगाराचे साहित्य असा 2 लाख 30 हजार 160 रुपयांचा  ऐवज जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षकांच्या या सर्वात मोठय़ा कारवाईने अवैध धंदे चालकांचे धाबे दणाणले आहेत.
परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक म्हणून धनंजय पाटील हे नुकतेच जळगाव शहरात रुजू झाले. शहरात सुरु असलेल्या अवैध धंद्याबाबत त्यांनी पोलीस अधीक्षक दत्रात्रय कराळे, अपर पोलीस अधीक्षक बच्चन सिंह व उपअधीक्षक सचिन सांगळे यांच्याशी चर्चा केली. 
त्यानंतर गुरुवारी शनी पेठचे निरीक्षक प्रवीण वाडिले, उपनिरीक्षक भिमराव शिंदे, कॉन्स्टेबल जितेंद्र सोनवणे, गणेश गव्हाळे, प्रकाश कोकाटे, अनिल कामळे व रामेश्वर ताठे यांच्यासह मुख्यालयाचे कर्मचारी सोबत घेऊन नेरी नाका स्मशानभूमीजवळील ङिापरु अण्णा नगरात सट्टापेढीवर अचानक धाड टाकली.
26 जणांना केली अटक
सट्टा पेढी मालक खंडू वामन राणे (रा.विठ्ठल पेठ, जळगाव), महेंद्र बन्सी बिरारी (रा.सम्राट कॉलनी, जळगाव), पितांबर चिंधू तायडे (रा.म्हाडा कॉलनी, जळगाव), जगन्नाथ मरतड सोनवणे (रा.जैनाबाद, जळगाव), भरत रमेश मोरे (रा.खेडी खुर्द,जळगाव),  रितेश रामकृष्णा नेरकर, कमलाकर रामा सोनवणे, संजय निमानंद खुडे, निंबा दगडू पाटील, मनोहर विनायक पाटील, संतोष शंकर गायकवाड, माधवराव नथ्थूजी जाधव, दीपक भिमराव पवार, संदीप गोकुळ सुरळकर, राजू भागवत पाटील, अशोक धना भालेराव, उस्मानअली वाहेद अली, ज्ञानेश्वर केशव महाजन, विजय सुभाष चौहान, सारनाथ अमृत जोहरे, घनश्याम राजाराम पाटील, कलीम खान इनायत खान, अमोल श्रीकृष्ण पाटील, नारायण गणू कोलते व राजेंद्र शालिक सोनवणे यांना अटक केली. 

Web Title: jalgaon police rade case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.