जळगाव मनपाच्या बंद पडलेल्या घनकचरा प्रकल्पाच्या धुरामुळे आव्हाणे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 06:27 PM2018-03-18T18:27:01+5:302018-03-18T18:27:01+5:30

मनपाच्या आव्हाणे शिवारातील बंद पडलेल्या घनकचरा प्रकल्पात अनेकदा कचरा पेट घेण्याचे प्रकार घडतात. या पेट घेणाºया कच-याचा धुरामुळे शनिवारी रात्री आव्हाणे येथे सुरु असलेल्या हरिनाम किर्तन सोहळ्यादरम्यान भाविकांना त्रास झाल्याने किर्तन निर्धारीत वेळेच्या अर्धातास आधी थांबवावे लागले.

Jalgaon Municipal Corporation's health hazard to scorch due to collapsed solid waste | जळगाव मनपाच्या बंद पडलेल्या घनकचरा प्रकल्पाच्या धुरामुळे आव्हाणे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात

जळगाव मनपाच्या बंद पडलेल्या घनकचरा प्रकल्पाच्या धुरामुळे आव्हाणे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात

Next
ठळक मुद्देभाविकांना त्रास झाल्याने अर्धा तास आधी थांबविले किर्तन शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांचेही आरोग्य धोक्यातगेल्या तीन वर्षांपासूनची समस्या

आॅनलाईन लोकमत

जळगाव,दि.१८ -मनपाच्या आव्हाणे शिवारातील बंद पडलेल्या घनकचरा प्रकल्पात अनेकदा कचरा पेट घेण्याचे प्रकार घडतात. या पेट घेणाºया कच-याचा धुरामुळे शनिवारी रात्री आव्हाणे येथे सुरु असलेल्या हरिनाम किर्तन सोहळ्यादरम्यान भाविकांना त्रास झाल्याने किर्तन निर्धारीत वेळेच्या अर्धातास आधी थांबवावे लागले.

बंद पडलेल्या घनकचरा प्रकल्पातून निघणाºया धुरामुळे शहरातील खोटेनगर, निमखेडी, प्रा.चंदु अण्णा नगरभागातील रहिवाश्यांप्रमाणेच ग्रामीण भागातील आव्हाणे, भोकणी, आव्हाणी या भागातील नागरिकांचेही आरोग्य धोक्यात आले आहे. शनिवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घनकचरात पेटलेल्या कचºयामुळे आव्हाणे परिसरात प्रचंड धुराचे लोड पसरले होते. यामुळे नागरिकांना घराचे दरवाजे बंद करून घ्यावे लागले.

श्वसनाचा त्रास व डोळ्यांमध्ये जळजळ
आव्हाणे परिसरात दररोज हा कचºयामुळे धुर पसरतो. मात्र, शनिवारी या धुराचे प्रमाण अधिक होते. त्यामुळे सायंकाळी घराबाहेर बसलेल्या नागरिकांना श्वास घेताना देखील त्रास होत होता. तसेच अनेकांच्या डोळ्यांमध्ये जळजळ देखील झाली. लहानमुलांना या धुरामुळे अधिक त्रास होत असल्याचे दिसून आले. त्यामुळे नागरिकांनी घरामध्येच थांबणे पसंत केले.

गेल्या तीन वर्षांपासूनची समस्या
घनपकचरा प्रकल्पामुळे आव्हाणेकरांना गेल्या तीन ते चार वर्षांपासून त्रास सहन करावा लागत आहे. नियमित पसरणाºया धुरामुळे नागरिकांचे आरोग्य देखील धोक्यात आले आहे. हजारो टन कचरा कुठल्याही प्रक्रियेविना पडून असल्यामुळे प्रचंड दुर्गंधी देखील आव्हाणे परिसरात पसरलेली असते. याबाबत नागरिकांकडूनच बुधवारी मनपा प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांना निवेदन दिले जाणार आहे.  

किर्तनात बसणे देखील कठीण झाले
गेल्या पाच दिवसांपासून आव्हाणे येथे अखंड हरिनाम कि र्तन सप्ताह सुरु आहे. शनिवारी रात्री किर्तन सुरु असताना वातावरण प्रचंड धुर पसरला असल्यामुळे किर्तनात बसलेल्या भाविकांना श्वास घेताना देखील त्रास होत होता. तसेच किर्तनकार व इतर भजनीमंडळातील सदस्यांना बोलताना त्रास होत होता. त्यामुळे दररोज ११.१५ वाजता संपणारा किर्तनाचा कार्यक्रम १०.४५ वाजताच थांबवून घ्यावा लागला. मात्र, मनपा प्रशासनाविरोधात गावातील नागरिकांनी प्रचंड संताप व्यक्त केला असून, या प्रकल्पात कचरा टाकणे थांबविण्याची मागणी केली आहे.

Web Title: Jalgaon Municipal Corporation's health hazard to scorch due to collapsed solid waste

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.