जळगाव जिल्ह्यात घरफोडी करणारे दोन अट्टल चोरटे जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 10:38 PM2018-03-10T22:38:59+5:302018-03-10T22:38:59+5:30

नाशिक उपनगरात वास्तव्य करुन जळगाव शहर, पाचोरा, भुसावळ या भागात घरफोडी करणाºया कुंदन उर्फ राहूल नाना पाटील (वय २५ रा. रामेश्वर, ता. अमळनेर) व गुरुदेव उर्फ पिंटू कृष्णाजी हेमणे (वय २४,रा.साकरा, ता.साकोली, जि.भंडारा) दोन्ही ह.मु.नाशिक या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भुसावळ येथून अटक केली. त्यांच्याकडून  १६ हजार रुपये रोख व मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे.

In the Jalgaon district, two unruly burglars trapped in Jalgaon district | जळगाव जिल्ह्यात घरफोडी करणारे दोन अट्टल चोरटे जाळ्यात

जळगाव जिल्ह्यात घरफोडी करणारे दोन अट्टल चोरटे जाळ्यात

Next
ठळक मुद्दे एलसीबीची कारवाई  नाशिकमध्ये वास्तव्य करुन जळगाव जिल्ह्यात घरफोड्या रोख रक्कम, मोबाईल हस्तगत

आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,१०: नाशिक उपनगरात वास्तव्य करुन जळगाव शहर, पाचोरा, भुसावळ या भागात घरफोडी करणाºया कुंदन उर्फ राहूल नाना पाटील (वय २५ रा. रामेश्वर, ता. अमळनेर) व गुरुदेव उर्फ पिंटू कृष्णाजी हेमणे (वय २४,रा.साकरा, ता.साकोली, जि.भंडारा) दोन्ही ह.मु.नाशिक या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भुसावळ येथून अटक केली. त्यांच्याकडून  १६ हजार रुपये रोख व मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे.
शहरातील इस्लामपुरा भागातील सालार मार्केटमधील खेळणीचे दुकान ९ मार्च रोजीच्या रात्री फोडून त्यातील २८ हजार ५०० रुपये किमतीचा ऐवज चोरुन नेल्याचा प्रकार उघड झाला होता. त्याआधी ३१ जानेवारी रोजी पाचोरा शहरातील रामेश्वरीबाई अग्रवाल पतसंस्थेच्या कार्यालयातूनही १५ हजार ५०० रुपये चोरी झालेले होते. या दोन्ही गुन्ह्यांचा तपास करीत भुसावळ रेल्वे स्थानकावर दोन संशयितांना रेल्वे सुरक्षा बलाच्या पथकाने पकडल्याची माहिती हेडकॉन्स्टेबल रवींद्र पाटील यांना मिळाली. या संशयितांनी त्यांची नावे राहूल अशोक पाटील व कैलास हरी कुणबी अशी सांगून पोलिसांची दिशाभूल केली होती. रवींद्र पाटील यांना शंका आल्याने त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांना घटनेची माहिती दिली. कुराडे यांनी लागलीच रवींद्र पाटील, दीपक पाटील, शरीफ काझी,प्रकाश महाजन, इद्रीस पठाण सुभाष पाटील व गफूर तडवी यांचे पथक भुसावळला पाठविले.
एलसीबीच्या चौकशी फुटले बींग
या पथकाने दोघांना जळगावला आणले असता खाकी हिसका दाखविताच दोघांनी खरे नाव व पत्ते सांगितले. तसेच त्यांच्याजळील रोख रक्कम, मोबाईल काढून दिला. जळगाव, पाचोरा, शनी पेठ व भुसावळ येथे घरफोडी केल्याची कबुली त्यांनी दिली. जळगाव व भुसावळ रेल्वे स्थानकावर वास्तव्य करुन शहर व परिसरात घरफोडी केली जात असल्याचे त्यांनी चौकशीत सांगितले.

Web Title: In the Jalgaon district, two unruly burglars trapped in Jalgaon district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.