जळगावात दस:याच्या मुहूर्तावर 150 घरांचे बुकिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 11:46 PM2017-09-29T23:46:36+5:302017-09-29T23:49:45+5:30

600 किलो श्रीखंड होणार फस्त

Jalgaon dasara Booking for 150 houses at its museum | जळगावात दस:याच्या मुहूर्तावर 150 घरांचे बुकिंग

जळगावात दस:याच्या मुहूर्तावर 150 घरांचे बुकिंग

googlenewsNext
ठळक मुद्देश्रीखंडाला तीनपटीने वाढली मागणीङोंडू फुलाच्या बाजारात तेजीबाजारात खरेदीसाठी गर्दी

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 29 - नवरात्रोत्सव व विजयादशमीच्या पाश्र्वभूमीवर बाजारपेठेत चैतन्याचे वातावरण असून घरांच्या खरेदीमध्येही उत्साह दिसून येत आहे. नोटाबंदीनंतर तब्बल 10 महिन्यांनी या क्षेत्रात प्रेरक वातावरण तयार होण्यास सुरुवात झाली असून विजयादशमीसाठी दीडशेवर घरांचे बुकिंग झाले आहे. या सोबतच बाजारपेठेत गोडधोड पदार्थाना मागणी वाढली असून दस:याच्या  दिवशी जवळपास 600 किलो श्रीखंड फस्त होणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. ङोंडूच्या बाजारातही मोठी आवक वाढली असून खरेदीसाठी उत्साह आहे. 

दहा महिन्यांनंतर उत्साहाचे वातावरण
गेल्या वर्षी 8 नोव्हेंबर रोजी नोटाबंदीच्या निर्णयानंतर रियल इस्टेट क्षेत्रात मोठी मंदी पसरली व या क्षेत्रात कधी नव्हे एवढे चिंतेचे वातावरण पसरले. हातचा पैसा गेल्याने यातील गुंतवणूक थांबली व बांधकाम व्यावसायिक हवालदिल झाले. मात्र आता 10 महिन्यांनंतर आता पुन्हा यामध्ये घर खरेदीला सुरुवात झाली असून साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या विजयादशमीसाठी जळगावात दीडशेवर घरांचे बुकिंग झालेले आहे. 

व्याजदर कमी झाल्याचा फायदा
सध्या बँकाचे गृहकर्जासाठीचे व्याजदरही कमी आहे. त्याचाही फायदा घेतला जात असून सामान्यांच्या घराचे स्वप्न आता पूर्ण होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे. 

विजयादशमीला श्रीखंडाला मोठी मागणी असते. त्यानुसार जळगावातही ही मागणी वाढली असून यंदा  नेहमीपेक्षा तीनपट श्रीखंड विजयादशमीच्या दिवशी विक्री होत हा खप जवळपास 600 किलोवर जाणार असल्याचे सांगण्यात आले. जिल्हाभरात जळगाव शहरातील श्रीखंडाला मागणी असते. 

नवनवीन फ्लेवर
सध्या श्रीखंडमध्ये पाच वेगवगेळे फ्लेवर उपलब्ध करून देण्यात आले असून यामध्ये राजभोग, ड्रायफ्रूट, अंजीर काजू, फ्रेश फ्रूट, आम्रखंड या फ्लेवरला पसंती दिली जात आहे. या सोबतच बासुंदीलादेखील मागणी असून तिचीही जोरात विक्री होण्याचा अंदाज आहे. 

ङोंडूच्या फुलांची मोठी आवक वाढली असून शुक्रवारी कलकत्ता ङोंडूचे  किरकोळ भाव 110 ते 125 रुपयांवर पोहचले होते. इतर प्रकार 50 ते 60 रुपये किलोवर होते. यामध्ये विजयादशमीला आवक वाढली तर भाव कमी होण्याची शक्यता आहे. 

विजयादशमीच्या पूर्वसंध्येला बाजारपेठेत विविध वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी झालेली होती. खाद्यपदार्थासह गृहसजावट, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, वाहने, कपडे इत्यादी वस्तूंच्या खरेदीची लगबग दिसून आली. 

घर खरेदीसाठी सकारात्मक वातावरण तयार होत असून विजयादशमीसाठी बुकिंगही केले जात आहे. या क्षेत्रात पूर्वस्थिती येत आहे. 
- विनय पारख, संचालक, पीपीआरएल. 

विजयादशमीसाठी श्रीखंडाला मागणी असते. यंदाही या दिवशी चांगली विक्री होण्याचा अंदाज असून  जिल्हाभरातील नागरिकांकडून श्रीखंडाला पसंती असते. 
- मुकेश टेकवाणी, संचालक, सरस्वती डेअरी. 

Web Title: Jalgaon dasara Booking for 150 houses at its museum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.