चाळीसगाव तालुक्यातील उमरखेड येथे आंतरशाखीय वक्तृत्व स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 03:14 PM2019-01-19T15:14:46+5:302019-01-19T15:17:13+5:30

उंबरखेड, ता. चाळीसगाव , जि.जळगाव : येथील सर्वोदय शिक्षण संस्था संचलित शाळांच्या आंतरशाखीय वक्तृत्व स्पर्धा उंबरखेड येथील रामराव जिभाऊ ...

Inter School Orientation Tournament at Umerkhed in Chalisgaon Taluka | चाळीसगाव तालुक्यातील उमरखेड येथे आंतरशाखीय वक्तृत्व स्पर्धा

चाळीसगाव तालुक्यातील उमरखेड येथे आंतरशाखीय वक्तृत्व स्पर्धा

googlenewsNext
ठळक मुद्देरामराव जिभाऊ विद्यालय विजेतागुढे विद्यालय उपविजेतागेल्या ३० वर्षांपासून आंतरशाखीय क्रीडा व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन


उंबरखेड, ता.चाळीसगाव, जि.जळगाव : येथील सर्वोदय शिक्षण संस्था संचलित शाळांच्या आंतरशाखीय वक्तृत्व स्पर्धा उंबरखेड येथील रामराव जिभाऊ माध्यमिक विद्यालयात झाल्या.
संस्थेच्या आठ शाखांमधील विद्यार्थ्यांनी मराठी व इंग्रजी व हिंदी या तीन भाषांमध्ये आणि पाचवी ते आठवी लहान गट व नववी दहावी मोठा गट अशा दोन्ही गटात ४८ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. स्पर्धेचे उद्घाटन सरस्वती व कैलास वासी रामराव जिभाऊ यांच्या प्रतिमा पूजनाने झाले. या वेळी संस्थेचे चेअरमन उदेसिंग पवार, व्हाईस चेअरमन विकास पंडितराव पाटील, सचिव प्रकाश शंकराव पाटील, सहसचिव उदयसिंग मोहन पाटील व सर्व संचालक उपस्थित होते.
या वक्तृत्व स्पर्धेत रामराव जिभाऊ विद्यालयाने विजेतेपद मिळवले तर स.मा. विद्यालय गुढे या शाखेने उपविजेता पदाचा बहुमान मिळवला. सर्व शाखांमधून तिन्ही भाषा व दोन्ही गटातून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना संस्थेचे सचिव प्रकाश शंकराव पाटील, संचालक गोकुळ येवले, भाऊलाल अहिरे, संजय संतोष पाटील, दिलीप धर्मा पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र व शैक्षणिक साहित्य देऊन गौरव करण्यात आला.
गेल्या ३० वर्षांपासून संस्थेत आंतरशाखीय क्रीडा व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन सातत्याने आळीपाळीने एकेका शाखेवर केले जात आहे. स्पर्धा यशस्वीतेसाठी प्राचार्य डी.व्ही.शिरोडे, पर्यवेक्षक आर.आर.पाटील व शिक्षक व शिक्षकेतरांंचे सहकार्य लाभले.

Web Title: Inter School Orientation Tournament at Umerkhed in Chalisgaon Taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.