चिंचपुरा गावात सहकार राज्यमंत्र्यांच्या हस्ते विकासकामांचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 05:26 PM2017-12-16T17:26:49+5:302017-12-16T17:30:11+5:30

मुख्यमंत्री पेयजल योजना व मुख्य रस्ता कॉक्रीटीकरण कामाचे भूमीपूजन

Inauguration of development works at the hands of Co-operative Minister of State in Chinchpura | चिंचपुरा गावात सहकार राज्यमंत्र्यांच्या हस्ते विकासकामांचा शुभारंभ

चिंचपुरा गावात सहकार राज्यमंत्र्यांच्या हस्ते विकासकामांचा शुभारंभ

googlenewsNext
ठळक मुद्देदलित वस्तीत नवबौध्द घटक योजनेंतर्गत ५ लाख रुपयांच्या कॉक्रीटीकरणमुख्यमंत्री पेयजल योजनेतून गावांत पिण्याच्या पाण्याची विहीरीचे भूमीपुजनसहकार राज्यमंत्र्यांसह मान्यवरांची उपस्थिती

आॅनलाईन लोकमत
धरणगाव, दि.१६ : तालुक्यातील चिंचपुरा हे गाव सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी दत्तक घेतले आहे. येथे विविध विकास कामांचे शुभारंभ करण्यात आला.
चिंचपुरा येथे मुख्यमंत्री पेयजल योजनेतून गावांत पिण्याच्या पाण्याची विहीर व गावातील मुख्य रस्ता कॉक्रीटीकरण कामाचे भूमिपूजन झाले. तसेच शेरी या गावातील दलित वस्तीत नवबौध्द घटक योजनेंतर्गत ५ लाख रुपयांच्या कॉक्रीटीकरण रस्त्याचे भूमिपूजन सहकार राज्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, तालुका प्रमुख गजानन पाटील, सोनवद पिंप्री गटातील जिल्हा परिषद सदस्य गोपाल चौधरी, पं. स. सभापती सचिन पवार, उपसभापती प्रेमराज पाटील, पं. स. सदस्य मुकुंद नन्नवरे, पं.स. सदस्य अनिल पाटील, पं.स. सदस्य जनाबाई कोळी, सरपंच वसंताबाई कोळी, दत्तू ठाकूर, शिवसेना विभाग प्रमुख सुधाकर पाटील, दीपक साबळे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

Web Title: Inauguration of development works at the hands of Co-operative Minister of State in Chinchpura

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.