भुसावळ शहरासह तालुक्यात जुगार अड्ड्यांवर छापे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2019 05:16 PM2019-05-08T17:16:25+5:302019-05-08T17:17:51+5:30

ऐन अक्षय तृतीयेच्या दिवशी बाजारपेठ पोलिसांनी शहरात तर तालुका पोलिसांनी किन्ही येथे जुगार अड्ड्यांवर छापा टाकून १८ आरोपींना अटक करून कारवाई केली आहे.

Impressions on gambling bases in the taluka of Bhusawal city | भुसावळ शहरासह तालुक्यात जुगार अड्ड्यांवर छापे

भुसावळ शहरासह तालुक्यात जुगार अड्ड्यांवर छापे

Next
ठळक मुद्देऐन अक्षय तृतीयेच्या दिवशी पोलिसांची कारवाईशहर व तालुका पोलिसांच्या वेगवेगळ्या कारवाया १८ आरोपींना अटक

भुसावळ, जि.जळगाव : ऐन अक्षय तृतीयेच्या दिवशी बाजारपेठ पोलिसांनी शहरात तर तालुका पोलिसांनी किन्ही येथे जुगार अड्ड्यांवर छापा टाकून १८ आरोपींना अटक करून कारवाई केली आहे.
बाजारपेठ पोलिसांनी रात्री आठ वाजेच्या सुमारास आठवडे बाजारात ही कारवाई केली. यात सहा हजार सहाशे नव्वद रुपये हस्तगत केले आहे, तर तालुका पोलिसांनी रात्री एक वाजेच्या सुमारास कारवाई केली आहे. यात अठरा हजार शंभर रुपये रोख हस्तगत केले आहे. बाजारपेठ पोलीस ठाण्यात नऊ आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर तालुका पोलिस ठाण्यातही नऊ आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरात आठवडे बाजार भागात जुने तालुका पोलीस ठाण्याच्या मागील बाजुस कैलास सोनवणे, राहुल चौधरी, राजू ठोसरे, ठाकूर, संदीप चौधरी , प्रमोद संन्याशी, शाह उर्फ (गुड्ड्या) साबीर शाह चौधरी, प्रकाश चौधरी आदी संशयित झन्नामन्ना पत्ता जुगाराचा खेळ खेळत आहे व खेळवित असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यावरून उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड, पोलीस निरीक्षक देवीदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार अंबादास पाथरवट, पो.ना.सुनील थोरात, दीपक जाधव, नरेंद्र चौधरी, पो.काँ.कृष्णा देशमुख, नीलेश बाविस्कर, प्रशांत चव्हाण, संजय भदाणे, उमाकांत पाटील, राहुल चौधरी आदींनी लागलीच तेथे छापा त्यांना ताब्यात घेतले.
त्याच्याजवळ सहा हजार ६९० रुपये रोख व ५२ पत्त्याच्या कॅटसह हस्तगत केले आहे. या सर्वांविरुद्ध बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पो.ना.दीपक जाधव करीत आहे.
किन्ही येथे नऊ जणांना अटक
भुसावळ तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना माहिती मिळाली. त्यावरून किन्ही या गावी जाऊन ८ रोजी रात्री एक वाजता तालुका पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी छापा टाकून सुनील किशन थनवर, प्रदीप भालेराव, मिलिंद टोके, प्रकाश डोळे, विठ्ठल ठोके, विनोद सोनवर, अमोल धनवार, कोमलसिंग पाटील सर्व रा.किन्ही व दिलीपसिंग पचारवाल रा.भुसावल आदी झनना मन्ना नावाचा जुगारचा खेळ खेळताना मिळून आले. त्यांच्या विरुद्ध मुंबई जुगार कायदा कलम १२ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्याजवळून १८ हजार १०० रुपये रोख आणि तीन मोटारसायकल किंमत दोन लाख २८ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, पोलीस उपनिरीक्षक गजानन करेवाड, पो. हे.कॉ. विठ्ठल फुसे सुनील चौधरी, राजेंद्र पवार यांनी केली.

Web Title: Impressions on gambling bases in the taluka of Bhusawal city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.