१० हजार हेक्टरवरील फळबागांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 12:01 PM2019-01-18T12:01:32+5:302019-01-18T12:01:54+5:30

९ हजार ७० शेतकऱ्यांचे नुकसान, झाडे पिवळी पडू लागली

Horticulture affected by 10 thousand hectares | १० हजार हेक्टरवरील फळबागांना फटका

१० हजार हेक्टरवरील फळबागांना फटका

Next
ठळक मुद्देदुष्काळाचा दाह 



जळगाव : दुष्काळाचा फटका जिल्ह्यातील फळबागांनाही मोठ्या प्रमाणावर बसला आहे. सुमारे ४० हजार हेक्टरवरील फळबागांपैकी १० हजार हेक्टरवरील फळबागा नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यापैकी ७८३४ शेतकºयांच्या ८ हजार ७९६ हेक्टरवरील फळबागांचे ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले असून अनेक बागा सुकून गेल्या आहेत.
जिल्ह्यात यंदा सरासरीच्या जेमतेम ६७ टक्केच पाऊस झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत ५ टक्के कमीच पाऊस झाल्याने यंदा जलस्त्रोतांमध्ये पाणीसाठा अत्यल्प आहे. त्यामुळे जिल्ह्यात १५ पैकी १३ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाला असून उर्वरीत २ तालुक्यांमध्येही दुष्काळीच परिस्थिती आहे. भर पावसाळ्यातही पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरूच होते. तर पावसाळा संपताच टँकरची संख्या वाढू लागली आहे.
पिण्याच्या पाण्याची अशी परिस्थिती असल्याने फळबागांची परिस्थिती खूपच बिकट झाली आहे. अनेक ठिकाणी पाण्याअभावी फळबागा सुकून गेल्या आहेत. तर काही ठिकाणी झाडे पिवळी पडत चालली आहेत.
१२३८ हेक्टरवर ३३ ते ५५ टक्के नुकसान
जिल्ह्यातील १२३६ श्ोतकºयांचे सुमारे १२३८ हेक्टरवरील फळबागांचे ३३ ते ५० टक्के नुकसान झाले आहे. त्यात पाचोरा तालुक्यात ४९७ हेक्टर, चाळीसगाव २९८ हेक्टर, जामनेर १२२ हेक्टर, भडगाव ३६ हेक्टर, मुक्ताईनगर ५४ हेक्टर, बोदवड २९ तर जळगाव तालुक्यात २०२ हेक्टरवर नुकसान झाले आहे.
अनेक बागा वाळल्या
जिल्ह्यात केळीचे क्षेत्र वगळून सुमारे ४० हजार हेक्टरवर फळबागा आहेत. त्यात प्रामुख्याने मोसंबी, डाळींब, लिंबू, सिताफळ, आंबा आदी फळझाडांची लागवड करण्यात आली आहे. मात्र दुष्काळामुळे पाण्याअभावी अनेक बागा जळून गेल्याचे चित्र दिसून येत आहेत. त्यामुळे कृषी विभागातर्फे या बागा वाचविण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांची माहिती देऊन त्याची अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले जात आहे.
८७९६ हेक्टरवर ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान
जिल्ह्यातील ७८३४ शेतकºयांच्या ८७९६.८७ हेक्टरवरील फळबागांचे ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. त्यात भुसावळ तालुक्यात २८७ हेक्टर, बोदवड ४१, यावल ४३, मुक्ताईनगर ६०, अमळनेर ३९७ हेक्टर, चोपडा ४३५ हेक्टर,पारोळा ३७८.९२ हेक्टर, चाळीसगाव २९८८ हेक्टर, जामनेर २४४ हेक्टर, पाचोरा ८८१ तर भडगाव तालुक्यात ३०४२ हेक्टरवरील फळबागांचे ५० टक्के पेक्षा अधिक नुकसान झाले आहे.

Web Title: Horticulture affected by 10 thousand hectares

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.