धरणगावला शेतमजुराचा उष्माघाताने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2019 06:28 AM2019-06-01T06:28:12+5:302019-06-01T06:28:19+5:30

ऐन कडक उन्हात दिवसभर काम केल्यामुळे घरी येत असतांना त्यांना चक्कर येवून उलट्या झाल्या.

Heavy mortality in farmland | धरणगावला शेतमजुराचा उष्माघाताने मृत्यू

धरणगावला शेतमजुराचा उष्माघाताने मृत्यू

Next

धरणगाव : जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथील मोठ्या माळी वाड्यातील रहिवासी शेतमजुर जगन्नाथ चत्रू महाजन (६०) या शेतमजुराचा ३१ रोजी उष्माघाताने मृत्यू झाला.

जगन्नाथ महाजन हे दि.३१ रोजी नेहमी प्रमाणे रामचंद्र महाजन यांच्या शेतात मजुरील गेले होते. ऐन कडक उन्हात दिवसभर काम केल्यामुळे घरी येत असतांना त्यांना चक्कर येवून उलट्या झाल्या. सोबतच्या मजूरांनी त्यांना घरी आणले. कुटुंबियांनी त्यांना दवाखान्यात दाखल केले. ग्रामीण रुग्णालयात डॉ.गिरीष चौधरी यांनी  त्याच्यावर उपचार केले. उपचारा दरम्यान एक तासांत त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर शनिवार १ रोजी सकाळी ९ वा. अंत्यसंस्कार केले जाणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी , दोन मुलं, तीन मुली असा परिवार आहे.            

दरम्यान, रुग्णाला तपासल्यानंतर त्यांची लक्षणे उष्माघाताची असल्याची दाट शक्यता आहे. उलटी झाल्याने ती उलटी गिळली गेली असल्यास रुग्णाला एक्सपिरियशन निमोनियाचा प्रकार होवू शकतो अशी माहिती डॉ.गिरीष चौधरी यांनी लोकमतशी बोलतांना दिली.

Web Title: Heavy mortality in farmland

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.