ग्रासरूट इनोव्हेटर : जळगावच्या उद्योगशील युवकाने भंगारातून बनविले मिनी पॉवर टिलर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 12:20 PM2018-12-12T12:20:02+5:302018-12-12T12:20:12+5:30

ग्रासरूट इनोव्हेटर : कुठलेही नवीन साहित्य न आणता भंगारातील चाके, बॉक्स पाईप खरेदी करून बनवले टिलर

Grassroot Innovator: The Mini Power Tiller made by the youngest businessman of Jalgaon | ग्रासरूट इनोव्हेटर : जळगावच्या उद्योगशील युवकाने भंगारातून बनविले मिनी पॉवर टिलर

ग्रासरूट इनोव्हेटर : जळगावच्या उद्योगशील युवकाने भंगारातून बनविले मिनी पॉवर टिलर

Next

- अजय पाटील (जळगाव)

जुगाड तंत्रज्ञानातून जळगाव येथील नीलेश भरत पाटील या युवकाने शेतकऱ्यांना उपयोगी पडेल असे मिनी पॉवर टिलर बनविले आहे. विशेष म्हणजे कुठलेही नवीन साहित्य न आणता भंगारातील चाके, बॉक्स पाईप खरेदी करून या युवकाने डिझेल व पेट्रोलवर चालणारे दीड हॉर्स पॉवर इंजिनचे टिलर तयार केले आहे.   

नीलेश हा जळगाव तालुक्यातील तुरखेडा या गावात राहतो. नीलेशने आयटीआयचे शिक्षण घेतले आहे. शिक्षण झाल्यानंतर नीलेशने त्याचे एमआयडीसी भागात स्वत:चे गॅरेज टाकले. गॅरेजचे काम करताना त्याच्यातील संशोधक शांत बसत नव्हता. शेतीसाठी काहीतरी विशेष यंत्र तयार करावे असे त्याच्या मनात आले. यानंतर गॅरेजमध्ये नीलेशने हे टिलर विकसित केले आहे. या यंत्राची रचना दुचाकीसारखी केली आहे. त्यासाठी दुचाकीची चाके, हॅँडल, बेअरिंग हे सर्व सामान त्याने भंगारातूनच खरेदी केले.

संपूर्ण टिलर तयार करण्यासाठी केवळ १८ हजार रुपयांचा खर्च आला असून, ताशी एक लिटर पेट्रोल किंवा डिझेलवर हे टिलर काम करते. टिलरचे ३५ ते ४० किलो इतके वजन असल्याने चालविताना शेतकऱ्यांना अडचणी येत नाहीत. या टिलरच्या साहाय्याने शेतकऱ्यांना आपल्या शेतात कोळपणी, नांगरणी, वखरणीचे काम करता येऊ शकते.  हे टिलर शेतातील मातीत फसणार नाही याची विशेष काळजी घेण्यात आली आहे. चाकाला होरिजेन्टल अँगल लावण्यात आले आहे. जेणेकरून चाके मातीत फसत नाहीत. तसेच हे टिलर चालता-चालता वापरावे लागणार असल्याने त्यावर वजनदेखील राहत नाही. टिलरला अ‍ॅक्सिलेटरदेखील देण्यात आले असून, क्लचदेखील बसविण्यात आला आहे. हे टिलर तयार करण्यासाठी नीलेशला त्याचे वडील भरत पाटील व मित्र तुषार पवार यांचे सहकार्य लाभले.

Web Title: Grassroot Innovator: The Mini Power Tiller made by the youngest businessman of Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.