राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ऑनलाइन परीक्षा केंद्राचे केले उद्घाटन 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2017 09:58 AM2017-12-20T09:58:29+5:302017-12-20T09:59:44+5:30

राज्यपाल  सी. विद्यासागर राव आज जळगावच्या दौ-यावर आहेत.  उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी ऑनलाइन परीक्षा केंद्राचे उद्घाटन केले.

Governor C. Vidyasagar Rao inaugurated the online examination center at North Maharashtra University | राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ऑनलाइन परीक्षा केंद्राचे केले उद्घाटन 

राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ऑनलाइन परीक्षा केंद्राचे केले उद्घाटन 

Next

जळगाव - राज्यपाल  सी. विद्यासागर राव आज जळगावच्या दौ-यावर आहेत.  उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी ऑनलाइन परीक्षा केंद्राचे उद्घाटन केले. सकाळी 8.45 वाजण्याच्या सुमारास जळगाव विमानतळावर त्यांचे आगमन झाले.
यावेळी विभागीय आयुक्त महेश झगडे, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे, अपर पोलिस अधीक्षक बच्चन सिंह आदिंनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच पोलीस बॅन्ड पथकानेही सलामी दिली. 

यानंतर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. पी. पाटील, महापौर ललीत कोल्हे, अशोक जैन यांनी स्वागत केले.  राज्यपालांचा दौरा असल्याच्या पार्श्वूभमूीवर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात जय्यत तयारी सुरू असून परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यामुळे विद्यापीठ परिसराला छावणीचे स्वरुप प्राप्त झाले आहे.

Web Title: Governor C. Vidyasagar Rao inaugurated the online examination center at North Maharashtra University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.