हे सरकार तर दुही निर्माण करणारे - राधाकृष्ण विखे-पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2017 05:59 PM2017-08-13T17:59:49+5:302017-08-13T18:09:28+5:30

तीन वर्षात नुसत्याच घोषणाशिवाय या सरकारने केले काय?

This government is creating duplicates - Radhakrishna Vikhe-Patil | हे सरकार तर दुही निर्माण करणारे - राधाकृष्ण विखे-पाटील

हे सरकार तर दुही निर्माण करणारे - राधाकृष्ण विखे-पाटील

Next
ठळक मुद्देआघाडी सरकारने राबविलेल्या योजनांची नावे बदलविण्याचे काम सत्ताधा:यांनी केले.घोषणाबाज असलेल्या सत्ताधा:यांकडे विकासाचे व्हीजन नाही.अपयश झाकण्यासाठी दुही निर्माण करण्याचा प्रयत्न

ऑनलाईन लोकमत
नंदुरबार, दि.13 - तीन वर्षात सरकारने केवळ घोषणा केल्या, कामांची बोंबाबोंब आहे. हे अपयश झाकण्यासाठी राज्यात सामाजिक दुही निर्माण करण्याचा प्रय} सत्ताधा:यांकडून सुरू असल्याचा आरोप विधानसभेचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील यांनी रविवारी नंदुरबारात केला.
नंदुरबार पालिकेच्या विविध विकास कामांचे उद्घाटन केल्यानंतर  आयोजित जाहीर सभेत विखेपाटील बोलत होते. भाजप सरकार घोषणाबाज सरकार आहे. कुठलेही नवीन विधायक किंवा विकासाचे व्हिजन न घेता आघाडी सरकारने राबविलेल्या जुन्या योजनांचीच नावे बदलून ती राबविली जात आहेत. गेल्या तीन वर्षात नाव घेण्यासारखा एकही प्रकल्प राज्यात येऊ शकला नाही. 34 हजार कोटी रुपयांची शेतक:यांची कजर्माफी जाहीर केली, परंतु त्यासाठी जाचक अटी लादल्याने शेतक:यांना अद्यापही त्याचा लाभ मिळू शकत नाही. सर्वच विभागात अनागोंदी सुरू आहे. त्यामुळे सरकारचे हे अपयश झाकण्यासाठी आणि जनतेचे लक्ष विचलीत करण्यासाठी सत्ताधारी सामाजिक दुही निर्माण करण्याचा प्रय} करीत असल्याचा आरोपही राधाकृष्ण विखेपाटील यांनी यावेळी केला.
प्रास्ताविक आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केले. माजी केंद्रीयमंत्री माणिकराव गावीत, माजीमंत्री आमदार सुरुपसिंग नाईक, आमदार अॅड.के.सी.पाडवी, आमदार डॉ.सुधीर तांबे, आमदार कुणाल पाटील, आमदार डी.एस.अहिरे, आमदार काशिराम पावरा, जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी नाईक, नगराध्यक्षा र}ा रघुवंशी यांची प्रमुख उपस्थित होती.
 

Web Title: This government is creating duplicates - Radhakrishna Vikhe-Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.