सोने ३५ हजारानजीक पोहोचून गडगडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 11:42 AM2019-07-10T11:42:28+5:302019-07-10T11:42:58+5:30

५०० रुपयांनी घसरण

Gold rose to 35 thousand rupees | सोने ३५ हजारानजीक पोहोचून गडगडले

सोने ३५ हजारानजीक पोहोचून गडगडले

Next

जळगाव : अर्थसंकल्पात सोन्यावरील सीमा शुल्कात वाढ करण्यासह अमेरिका, इराण व इराकमधील तणावामुळे तसेच मुंबई शेअर बाजारातील घसरणीचा परिणाम या सर्वांमुळे सुवर्ण बाजार अस्थिर होऊन मोठी चढ-उतार होत आहे. यात ८ जुलै रोजी सोने ३४ हजार ९०० रुपयांवर पोहचल्यानंतर ९ रोजी एकाच दिवसात ५०० रुपयांनी घसरण होऊन ते ३४ हजार ४०० रुपयांवर आले. चांदीचे भाव मात्र स्थिर आहेत.
सोने-चांदीच्या भावावर आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच अमेरिकन डॉलर व आंतरराष्ट्रीय पातळीवरील सोन्याच्या भावाचा मोठा परिणाम होऊन त्यांचे भाव कमी जास्त होत असतात. अशाच प्रकारे सध्या अमेरिका, इराण, इराक यांच्यातील तणावाच्या वातावरणाचा परिणाम सोन्यावर होत आहे. सोबतच आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याची तस्करी वाढून दलालांकडून सोन्यात कृत्रिम वाढ होत आहे. त्यामुळे २० जून रोजी सोने ३४ हजार रुपये प्रती तोळ््यावर पोहचले. त्यानंतर सोन्यात चढ-उतार सुरूच राहून ४ जुलै रोजी ते ३४ हजार ४०० रुपयांवर पोहचले. त्यानंतर ५ रोजी सकाळी हेच भाव असताना दुपारी केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाला व त्यात सोन्यावरील सीमा शुल्कात अडीच टक्क्याने वाढ करण्यात आल्याने सोन्याचे भाव ३५० रुपये प्रती तोळ््याने वाढले व ते ३४ हजार ७५० रुपयांवर पोहचले. ही भाव वाढ अशीच सुरू राहून सोन्याने ३५ हजाराकडे झेप घेत ८ रोजी ते ३४ हजार ९०० रुपयांवर पोहचले.
५०० रुपयांनी घसरण
३४ हजार ९०० रुपयांवर सोने पोहचले असताना ते ३५ हजारावर जाणार असे वाटत असतानाच शेअर बाजारात मोठी घसरण होण्यासह आंरराष्ट्रीय पातळीवर दलालांनी सोने खरेदीत हात आखडचा घेतल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे भाव कमी झाले व भारतातही सोने एकाच दिवसात ५०० रुपये प्रती तोळ््याने घसरुन ९ जुलै रोजी ते ३४ हजार ४०० रुपयांवर आले.
विशेष म्हणजे भारतीय रुपयांच्या तुलनेत अमेरिकन डॉलरचे भाव वधारल्यास सोने महाग होते. मात्र ९ रोजी डॉलरचे ६८.४४ रुपयांवरून ६८.६८ रुपये झाले तरी सोन्यात ५०० रुपयांनी घसरण झाली. तस्करीमुळे हे परिणाम होत असल्याचे सुवर्ण व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

अमेरिका, इराण, इराक यांच्यातील तणावाची स्थिती व आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याचे भाव कमी-जास्त होत असल्याने भारतातही सोन्याचे भाव कमी जास्त होत आहेत. सोबत मुंबई शेअर बाजारातील घसरणीमुळेही सोन्याचे भाव ९ रोजी कमी झाले.
- अजयकुमार ललवाणी, अध्यक्ष, जळगाव शहर सराफ असोसिएशन.

Web Title: Gold rose to 35 thousand rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव