१४ फुटाच्या अजगराने गिळले बकरीचे पिल्लू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 10:38 PM2018-10-17T22:38:48+5:302018-10-17T22:40:56+5:30

हिंगणे बुद्रुक परिसरात मंगळवारी भिमा राठोड यांच्या मालकीच्या बकरीचे पिल्लू १४ फुटाच्या अजगराने गिळले.

Goats of swallow 14 pythons | १४ फुटाच्या अजगराने गिळले बकरीचे पिल्लू

१४ फुटाच्या अजगराने गिळले बकरीचे पिल्लू

Next
ठळक मुद्देहिंगणे बुद्रुक येथील गाळेगाव परिसरातील घटनाअजगराला दिले जळगाव वनविभागाच्या दिले ताब्यातअजगराला वनविभाग सोडणार जंगलात

पाळधी, ता.जामनेर - हिंगणे बुद्रुक परिसरात मंगळवारी भिमा राठोड यांच्या मालकीच्या बकरीचे पिल्लू १४ फुटाच्या अजगराने गिळले. सर्पमित्राच्या साहाय्याने या पिल्लाची सुटका करण्यात आली. मात्र तोपर्यंत ते मृत झाले होते. या अजगराला जळगाव वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे.
हिंगणे बुद्रुक येथे मंगळवारी भिमा राठोड हे गाळेगाव शिवारात आपल्या शेळ्या चारत असतांना अचानक एका अजगराने बकरीचे पिल्लू पकळून त्याला गिळण्याचा प्रयत्न केला. भिमा राठोड यांनी १४ फुटाचा अजगर पाहिल्यानंतर जोरजोरात ओरडायला सुरुवात केली. त्यामुळे आजूबाजूचे शेतकरी जमा झाले. राठोड यांनी उपसरपंच सुपडू बाविस्कर यांना घटनेबाबत माहिती दिली. त्यांनी सर्प मित्र नानेश्वर गोसावी यांना सोबत घेऊन घटनास्थळी गाठले. तोपर्यंत अजगराने बकरीचे पिल्लू गिळलेले होते. सर्प मित्राने अजगराला पकळून गिळलेले पिल्लू बाहेर काढले पण तो पर्यंत ते मृत झाले होत.

Web Title: Goats of swallow 14 pythons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.