चोपडा साखर कारखान्याकडून शेतात जाऊन शेतकऱ्यांना धनादेश वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 03:46 PM2017-12-02T15:46:02+5:302017-12-02T15:50:27+5:30

शेतकऱ्यांकडून ऊस पुरवठा करण्याबाबत टाळाटाळ होण्याची भीती असल्याने कारखान्याने सुरु केला उपक्रम

Giving checks to the farmers in the field from Chopda sugar factory | चोपडा साखर कारखान्याकडून शेतात जाऊन शेतकऱ्यांना धनादेश वाटप

चोपडा साखर कारखान्याकडून शेतात जाऊन शेतकऱ्यांना धनादेश वाटप

googlenewsNext
ठळक मुद्देवर्डी येथील शेतकरी राजेंद्र शिंदे यांना शेतातच दिला धनादेशशनिवारी ऊस तोड मुकादम ट्रकसह चोपडा कारखान्याला रवानाआॅनलाईन लोकमत चोपडा,दि.२ : गेल्या वर्षी थकीत असलेल्या ऊसाचे पेमेंट शेकऱ्यांना चोपडा साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी शेतात जाऊन वाटप करण्यास सुरुवात केली आहे. यावर्षी ऊस उत्पादकांना पैसे मिळण्याची शाश्वती नसल्याने त्यांनी कारखान्याला ऊस देण्यासाठी मागे पु

आॅनलाईन लोकमत
चोपडा,दि.२ : गेल्या वर्षी थकीत असलेल्या ऊसाचे पेमेंट शेकºयांना चोपडा साखर कारखान्याच्या कर्मचाºयांनी शेतात जाऊन वाटप करण्यास सुरुवात केली आहे. यावर्षी ऊस उत्पादकांना पैसे मिळण्याची शाश्वती नसल्याने त्यांनी कारखान्याला ऊस देण्यासाठी मागे पुढे करीत असल्याने कारखान्याने हा निर्णय घेतला आहे.
गेल्या वर्षाचे ऊस उत्पादक शेतकºयांचे ऊसाचे प्रति टन ३०० रुपये चोसाकाकडून धनादेश द्वारा वितरित करणे सुरू आहे. काही शेतकºयांनी यंदा ऊस दिल्यास ऊसाचे पैसेच मिळणार नाहीत, म्हणून ऊस इतर कारखान्यांना देणे सुरू केले आहे. बाहेरील कारखान्यास ऊस जाऊ नये व चोसाका कडे शेतकºयांनी ऊस द्यावा यासाठी हा उपक्रम सुरु केला आहे. चोसाकाचे चेअरमन अतुल ठाकरे थेट गेल्या वर्षी ३०० रु घेणे असलेल्या शेतकºयांच्या शेतात जाऊन धनादेश वितरित करीत आहेत. वर्डी ता.चोपडा येथील ऊस उत्पादक शेतकरी व सरपंच राजेंद्र शिंदे यांच्या शेतात शनिवार २ रोजी जाऊन ३०० रुपयांचा धनादेश दिला. त्यानंतर ऊस तोड मुकादम ट्रकसह चोपडा कारखान्याला रवाना झाला.

Web Title: Giving checks to the farmers in the field from Chopda sugar factory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.