गिरीश भाऊ लक्षात ठेवा, मौका सभी को मिलता है; धनंजय मुंडेंचा गिरीश महाजनांवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2018 10:34 PM2018-02-20T22:34:26+5:302018-02-20T22:34:35+5:30

जामनेरमध्ये आज पहिल्यांदा आलो आहे. तसा कधी योग आला नाही. पण आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सभेने जामनेर जाम झालं सभेला परवानगी मिळू नये, जागा मिळू नये यासाठी मंत्री गिरीश महाजन यांनी प्रयत्न केले.

Girish Bho remembers, the chance gets to everyone; Dhananjay Mundane's attack on Girish Mahajan | गिरीश भाऊ लक्षात ठेवा, मौका सभी को मिलता है; धनंजय मुंडेंचा गिरीश महाजनांवर हल्लाबोल

गिरीश भाऊ लक्षात ठेवा, मौका सभी को मिलता है; धनंजय मुंडेंचा गिरीश महाजनांवर हल्लाबोल

Next

जामनेर : जामनेरमध्ये आज पहिल्यांदा आलो आहे. तसा कधी योग आला नाही. पण आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सभेने जामनेर जाम झालं सभेला परवानगी मिळू नये, जागा मिळू नये यासाठी मंत्री गिरीश महाजन यांनी प्रयत्न केले. गिरीश भाऊ आज टाईम तुमचा आहे २०१९ला आमचा टाईम येईल. मौका सबको मिलता है या भाषेत विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर त्यांच्याच मतदार संघातल्या सभेत हल्लाबोल केला.

हल्लाबोल यात्रेच्या जामनेर मधील सभा आणि रॅली दरम्यान रस्त्यावरील लाईट बंद करणे, भाजपा समर्थकांना घुसवून सभेत व्यत्यय आणणे असे प्रकार  केले. सभेला परवानगी मिळणार नाही, जागा मिळणार नाही यासाठी मंत्र्यांनी खटाटोपी केल्याच्या तक्रारी कार्यकर्त्यांनी केल्या. त्यामुळे संतापलेल्या धनंजय मुंडे यांनी भाषणाला उभे राहतात संतप्त रूप धारण करत महाजन यांच्यावर मौका सभी को मिलता है अशा शब्दात हल्लाबोल केला.

ही लोकशाही आहे जर सरकार नीट काम करत नसेल तर त्याविरोधात आवाज बुलंद करणे ही विरोधी पक्षाची जबाबदारी आहे. जर हे आंदोलन कोणाच्या डोळ्यात खुपत असेल तर त्यांनी घरी बसावे.  असे सांगताना देशाचे चौकीदार असताना देशात मोठमोठे घोटाळे समोर येत आहे. असंच चालू राहिले तर देशाच्या नागरिकांना १५ लाख काही मिळणार नाही पण १५ लाखांचे कर्ज प्रत्येक नागरिकांवर होईल अशी भीती व्यक्त केली.

कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा म्हणण्याऐवजी आता कुठे आहे महाराष्ट्र माझा असे म्हणावे लागत आहे. भाजप प्रत्येक वर्षी दोन कोटी रोजगार देणार होते आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा म्हणतात तरुणांनी भजी तळावी. उच्च शिक्षित तरुण आता भजी तळणार का ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
  
भाजप एका निवडणुकीत जनतेला फसवू शकते, वारंवार हे शक्य नाही. येत्या निवडणुकीत जनताच यांना यांची जागा दाखवेल. असा विश्वास व्यक्त कऱतानाच जो व्यक्ती २५ वर्षे या भागाचा आमदार आहे तिथे पाण्याचा प्रश्न उद्भवतोय. हा लोकप्रतिनिधी म्हणजे बोंड अळीपेक्षा भयंकर आजार असल्याचा हल्लाबोल केला. ६५ वर्षे आपल्या वडिलधाऱ्यांनी या भाजपला सत्तेपासून का दूर ठेवले हे आज कळत असल्याचे ते म्हणाले. 

यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खा. सौ. सुप्रियाताई सुळे, माजी मंत्री जयंत पाटील, आ. दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री अरुण गुजराथी, आ. भास्कर जाधव, सौ चित्रा वाघ , संग्राम कोते, संजय गरुड आदी उपस्थित होते.

Web Title: Girish Bho remembers, the chance gets to everyone; Dhananjay Mundane's attack on Girish Mahajan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.