गणपतराव पोळ यांनी घडविले खो-खो खेळाडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 12:28 PM2018-12-16T12:28:24+5:302018-12-16T12:28:33+5:30

आकाश नेवे जळगाव : जळगावच्या क्रीडा क्षेत्रात गेल्या तीन दशकांपासून सातत्याने खो-खोचे खेळाडू राष्ट्रीय स्पर्धा गाजवत आहेत. त्यामागे आहे ...

Ganpatrao Pal created Kho-Kho players | गणपतराव पोळ यांनी घडविले खो-खो खेळाडू

गणपतराव पोळ यांनी घडविले खो-खो खेळाडू

Next

आकाश नेवे
जळगाव : जळगावच्या क्रीडा क्षेत्रात गेल्या तीन दशकांपासून सातत्याने खो-खोचे खेळाडू राष्ट्रीय स्पर्धा गाजवत आहेत. त्यामागे आहे ती शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त गणपतराव पोळ यांची सुमारे अर्धशतकांपेक्षा जास्त वर्षे सुरू असलेली तपस्या. एखाद्या परमभक्ताने नित्यनेमाने आपल्या आराध्य देवतेच्या दर्शनासाठी मंदिरात जावे, त्याच नित्यनेमाने आणि श्रद्धेने गणपतराव पोळ दररोज खो-खो शिकवण्यासाठी मैदानावर जात आहेत. त्यांच्या गणपतराव पोळ क्रीडा विकास प्रबोधिनीच्या माध्यमातून त्यांनी शेकडो खेळाडू घडवले आहेत.
१९६६ मध्ये गणपतराव पोळ यांच्या नेतृत्वात खो-खोच्या विकासासाठी फ्रेंड्स चेंबरची स्थापना करण्यात आली. तेव्हापासून खो-खोच्या विकासाला एक शिस्तबद्ध स्वरुप आले. त्यावेली पोळ हे ला.ना. सार्वजनिक विद्यालयात एन.डी.एस. क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत होते. सुमारे १४ वर्षे खो-खोचा सराव शाळेच्या मैदानात होत होता. त्यानंतर १६ वर्षे नुतन मराठा महाविद्यालयात खो-खोचा सराव होत राहिला. नंतर २००४ साली तीन वर्षे आर.आर. विद्यालय आणि नंतर शिवतीर्थ मैदानावर सराव होत होता. सध्या खो-खोचे प्रशिक्षण आणि सराव जळगाव जिल्हा क्रीडा संघाच्या मैदानावर होत आहे. पोळ हे लहान असताना बळीराम पेठेतील खांबेटे व्यायामशाळेत जात असत. तेथेच त्यांना खेळाची गोडी लागली. त्या काळात कुस्ती, गोळाफेक, लेझीम हे त्यांचे आवडते खेळ होते. १९६४ मध्ये मॅट्रिक पास झाल्यानंतर त्यांनी केंद्र सरकारच्या एन.डीएसआयचे प्रशिक्षण सरिस्का, राजस्थानमध्ये घेतले. त्यानंतर नेहरु विद्या मंदिर, तळवेल ता. भुसावळ येथे क्रीडा शिक्षक म्हणून काम करण्यास सुरूवात केली.
या काळात त्यांना बी.डी. पाटील, डॉ. अविनाश आचार्य, प्रा.पु.ग.अभ्यंकर, गोवर्धन राठी यांचे मार्गदर्शन मिळाले. त्यांनी खेळाडूंच्या विकासासाठी त्यांना विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले. १९९७० ते १९८० या काळात ही शिबिरे आयोजित केली. त्यानंतर राज्य संघाची शिबिरे घेत आणि युवा खेळाडूंना मार्गदर्शन करण्याचे कार्य ते आजही करतात.
अनेक राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय खो-खो स्पर्धा जळगाव शहरात आणि जिल्ह्यात आयोजित करण्यात गणपतराव पोळ यांचा सिंहाचा वाटाआहे.

Web Title: Ganpatrao Pal created Kho-Kho players

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.