Ganpati Festival...चोपड्यात सतरा तास चालली गणेश विसर्जन मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 09:10 PM2018-09-18T21:10:47+5:302018-09-18T21:13:24+5:30

सार्वजनिक गणेश मंडळांचे चोपडा येथे पाचव्या दिवशी गणपती विसर्जन होत असते. तब्बल १७ तास मिरवणूक चालली.

Ganapati Festival ... Ganesh immersion procession for 17 hours in a stampede | Ganpati Festival...चोपड्यात सतरा तास चालली गणेश विसर्जन मिरवणूक

Ganpati Festival...चोपड्यात सतरा तास चालली गणेश विसर्जन मिरवणूक

Next
ठळक मुद्देपोलिसांचा किरकोळ लाठीचार्जपळापळ झाल्याने दोन जण जखमीपोलीस अधीक्षक शेवटपर्यंत ठाण मांडून

चोपडा, जि.जळगाव : सार्वजनिक गणेश मंडळांचे चोपडा येथे पाचव्या दिवशी गणपती विसर्जन होत असते. तब्बल १७ तास मिरवणूक चालली. या दरम्यान एका गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी हवेत कागद उडविल्याने झालेल्या दगडफेकीत पोलिसांनी लाठीचार्ज केला. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. या दरम्यान दोन जणांचे डोके फुटले आहे.
चोपड्यात सार्वजनिक गणेश मंडळांचे पाचव्या दिवशी गणपती विसर्जन होत असते. १७ रोजी सकाळी ९ वाजेपासून तर दुसऱ्या दिवशी १८ रोजी पहाटे दोन वाजेपर्यंत अशी १७ तास मिरवणूक चालली. शहरात ज्या मेनरोडवरुन गणेश विसर्जन मिरवणूक होत असते त्या मेनरोडच्या अरुंद गल्लीत गणेश मंडळाचे कार्यकर्ते लेझीम खेळत होते.
नगरसेवक पुत्र लाठीचार्जमध्ये जखमी
रात्री एक वाजेच्या सुमारास लाठीचार्जमध्ये माजी नगरसेवक संजय श्रावगी व नगरसेविका संजय श्रावगी यांच्या मुलास मार लागला. यानंतर त्यांनी हा प्रकार विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांच्याजवळ सांगितला. त्यानंतर मात्र अरुणभाई गुजराथी यांनी संतप्त भावना पोलिसांकडे व्यक्त केल्या. त्यावेळी काही वेळ पोलीस आणि जनता यांच्यात गोंधळ निर्माण झाला होता.
दोन जणांचे डोके फुटले
आझाद चौकालगतच्या गल्लीत रात्री १०.३० वाजेच्या सुमारास एका गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी हवेत कागद उडविले. तेव्हा किरकोळ दगडफेकीचे प्रकार झाले. त्यावेळी पोलिसांनी किरकोळ लाठीचार्ज केल्याने काही वेळ तणाव निर्माण झाला. यावेळी मात्र दोन जणांचे डोकी फुटले आहेत.

Web Title: Ganapati Festival ... Ganesh immersion procession for 17 hours in a stampede

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.