इंधन दराचे चक्रावणारे गणित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 01:44 PM2018-10-06T13:44:03+5:302018-10-06T13:46:37+5:30

राजकीय खेळीसाठी सुरू झालेली आकडेमोड तर नाही

Fuel-intensive mathematics | इंधन दराचे चक्रावणारे गणित

इंधन दराचे चक्रावणारे गणित

Next

विजयकुमार सैतवाल

जळगाव : आंतरराष्ट्रीय पातळीवर इंधनाचे दर कमी होत असताना भारतात मात्र ते वाढत गेले व आता आंतरराष्ट्रीय पातळीवर इंधनाचे दर मोठ्या प्रमाणात वाढले तरी भारतात इंधनाचे दर कमी होत आहे. इंधनाचे हे चक्रावणारे गणित राजकीय खेळीसाठी सुरू झालेली आकडेमोड तर नाही, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
जुलै व आॅगस्ट महिन्यात इंधनाचे दर आंतरराष्ट्रीय पातळीवर कमी असताना भारतात ते झपाट्याने वाढत गेले. सप्टेंबर अखेर तत्र पेट्रोलने नव्वदी गाठली. मात्र त्या उलट आता आंतरराष्ट्रीय पातळीवर इंधनाचे दर ८६ डॉलर प्रती बॅरल झाले असताना भारतात एकाच दिवसात पेट्रोलचे दर जवळपास पाच रुपयांनी कमी झाले तर डिझेलचे दर साधारण अडीच रुपयांनी व दुसऱ्या दिवशी पुन्हा दीड रुपया असे चार रुपयांनी डिझेल स्वस्त झाले.
आगामी निवडणुका डोळ््यासमोर ठेवून सत्ताधाºयांकडून हा दिलासा देण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा आता होऊ लागली आहे. आधीच दर वाढवून सरकारने गल्ला भरून आता दर कमी करण्याचे नाटक केल्या जात असल्याचाही आरोप विरोधकांकडून होत आहे. त्यामुळे या आकडेमोडबाबत वेगवेगळ््या चर्चा होताना दिसत आहे.
गेल्या अनेक दिवसांनंतर इंधनाचे दर कमी करून सरकारने सर्वांनाच दिलासा दिला असला तरी जळगावात मात्र पहिल्याच दिवशी रात्री १२ वाजेनंतरही इंधनाचे दर ‘जैसे थे’च असल्याचे दिसून आले. नवीन दर ५ आॅक्टोबर रोजी सकाळी सहा वाजेपासून लागू झाले. कमी झालेले दर ५ आॅक्टोबरपासून अर्थात गुरुवारी मध्यरात्रीपासून लागू होणार असल्याचे सरकारने जाहीर केले. या बाबत रात्री पाहणी केली असता रात्री १२ नंतरही गुरुवारी असलेलेच दर कायम असल्याचे दिसून आले. गुरुवारी पेट्रोल ९२.२६ रुपये प्रती लीटर होते तेच दर मध्यरात्रीनंतरही कायम होते. गुरुवारी डिझेलचे दर ७९.७७ रुपये होते, तेदेखील रात्री कायम होते. नवीन दर ५ आॅक्टोबर रोजी सकाळी सहा वाजेपासून लागू झाले. त्यानुसार पेट्रोलचे दर कमी ४.३५ रुपयांनी कमी होऊन ते ८७.९१ रुपये प्रती लीटर झाले तर डिझेलचे दर २.५९ रुपयांनी कमी होऊन ते ७७.१८ रुपये प्रती लीटर झाले.
याचा अर्थ सरकार केवळ मध्यरात्रीपासून दर लागू होतील, असे सांगते, मात्र कंपन्यांची यंत्रणा रात्री दर बदल स्वीकारत नाही, त्यामुळे सरकारची घोषणा म्हणजे केवळ बतावणी असते, अशीही चर्चा होत आहे.
प्रत्यक्षात इंधन दर बदलाबाबत त्याची अंमलबजावणी कधी करावी याबाबत शासनाकडून कोणत्याही सूचना प्रशासनालादेखील आलेल्या नव्हत्या.
दररोज इंधन दर बदलाच्या प्रक्रियेत (सिस्टीम)मध्ये सकाळी सहा वाजताच दर बदलतात. त्यामुळे रात्री बारा वाजेपासून नवीन दर लागू होणे शक्य नसल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

Web Title: Fuel-intensive mathematics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.